Tuesday, June 18, 2024
Tuesday, June 18, 2024

HomeFact CheckFact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दाव्याला...

Fact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दाव्याला काहीच आधार नाही

Claim
उत्तरप्रदेशमध्ये हिंदू मुलीवर बलात्कार केलेल्या एका आरोपीची जामिनावर सुटल्यावर तुकडे करून हत्या करण्यात आली व नाल्यात फेकण्यात आले.

Fact
याप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. या दाव्याला कोणताच आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवरिया जिल्ह्यात हिंदू मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुस्लिम तरुणाच्या हत्येची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील मौ. गफ्फार नावाचा जिहादी काल एका हिंदू मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात जामिनावर बाहेर आला. आज अज्ञात व्यक्तीने गफ्फार मियांचे ५ तुकडे केले आणि नाल्यात फेकून दिले!” असे हा व्हायरल दावा सांगतो. यासंदर्भातील हिंदी भाषेतील दावा आम्हाला ट्विटर वर पाहायला मिळाला.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दावाला काहीच आधार नाही

हा मेसेज व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात पसरत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact check/ Verification 

या घटने संदर्भातील पोस्टचा व्हायरल होण्याचा वेग पाहता न्यूजचेकर ने या घटनेचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही ‘उत्तरप्रदेशातील देवारिया भागात बलात्काऱ्याचा खून’ तसेच ‘उत्तरप्रदेश तुकडे करून नाल्यात फेकले’ अशा किवर्ड च्या माध्यमातून शोध घेतला. मात्र काहीच हाती लागले नाही.

Fact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दावाला काहीच आधार नाही
Screengrab of Google Search

इतकी मोठी घटना घडलेली असताना त्याबद्दल कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आढळले नाहीत. यामुळे आम्ही आणखी शोध घेतला. मात्र उत्तरप्रदेशात हिंदू मुलीवर बलात्कार करणारी व्यक्ती जामिनावर सुटल्यावर तीचा खून करण्यात आल्याची कोणतीच माहिती मिळाली नाही.

यासंदर्भात जाणून घेण्यासाठी आम्ही स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला, देवारिया टाइम्स चे संपादक मनीष पांडे यांनी अशी घटना घडल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

अखेर आम्ही उत्तरप्रदेश येथील देवारीया भागात नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची माहिती मिळविली आणि त्यांच्याशी संपर्क केला.

उत्तरप्रदेश पोलीस संचानालयाने उपलब्ध केलेल्या संपर्क क्रमांकांवरून आम्ही याभागाचे एसपी संकल्प शर्मा यांच्याशी संपर्क केला असता, आम्हाला अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याची माहिती मिळाली नाही. “हिंदू मुलीवर बलात्कार केलेला कोणताही आरोपी नजीकच्या काळात जामिनावर सुटला नाही. आणि अशा कोणत्याही संशयित आरोपीवर हल्ला झाल्याची, त्याची तुकडे करून हत्त्या झाल्याची किंवा हत्या करून तुकडे नाल्यात फेकल्याची घटना घडलेली नाही, तसेच अशी घटना घडल्याची खबर मिळाली नाही,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Conclusion

आमच्या तपासात हा दावा खोटा आणि काल्पनिक घटनेवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Disclaimer: In case new information presents itself, this article will be updated

Our Sources

Google search results

Information provided by uppolice.gov.in

Conversation with SP of Deoria region Uttarpradesh

Conversation with Manish Pandey Editor, Deoria Times


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular