Authors
Claim
तुम्हाला ₹2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्यायच्या असल्यास विशिष्ट फॉर्म भरावा लागेल.
Fact
रिझर्व्ह बँकेने अशी कोणताही फॉर्म भरण्याची सक्ती केलेली नाही. हा दावा खोटा आहे.
कोणत्याही बँकेतून तुम्हाला जर ₹2000 च्या नोटा बदलून घ्यायच्या असतील तर विशिष्ट फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे, असा दावा सध्या एक फॉर्म शेयर करून करण्यात येत आहे.
आम्हाला आमच्या व्हाट्सअप टिपलाइन वर समान दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check / Verification
RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये जारी केल्यानंतर जवळपास सात वर्षांनी, RBI ने 19 मे 2023 रोजी ₹2,000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, सध्याच्या नोटा legal tender म्हणून कायम राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.
₹2000 च्या नोटेची कायदेशीर निविदा स्थिती कायम राहील, असे RBI ने त्यांच्या वेबसाइटवरील FAQ विभागात म्हटले आहे. नागरिक त्यांच्या व्यवहारांसाठी ₹2000 च्या नोटा वापरणे सुरू ठेवू शकतात. तथापि, त्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलून घेण्यास बँकांमध्ये सुविधा देण्यात आल्या आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे, तसेच नागरिक 23 मे पासून कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी ₹20,000 च्या मर्यादेपर्यंत ₹2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतात.
दरम्यान RBI ने ₹2000 च्या नोटा बदलून घेताना ठराविक फॉर्म भरावा लागत असल्याचे कुठेही म्हटल्याचे आम्हाला आढळले नाही. आम्ही RBI चे नोटिफिकेशन पाहिले त्यामध्ये असा उल्लेख असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले नाही.
आम्ही आरबीआय च्या ट्विटर हॅन्डल वर ही याबद्दल काही माहिती मिळते का? याचा तपास केला मात्र तशी कोणतीही सूचना मिळाली नाही.
RBI च्या संकेस्थळावरील FAQ विभागात नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसंदर्भात उत्तरे देण्यात आली आहेत. तेथे जाऊन पाहणी केली असता आम्हाला अशाप्रकारे कोणत्याही फॉर्म ची सक्ती करण्यात आली असल्याचे वाचनात आले नाही.
नागरिक आपले खाते नसलेल्या कोणत्याही बँकेच्या शाखेतूनही आपल्याकडील नोटा बदलून घेऊ शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. बँकांनी नियमित पद्धतीने कोणतेही जादाचे नियम न लावता या नोटा बदलून द्याव्यात. एकाद्या बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला आणि त्या बँकेच्या वरिष्ठांशी संपर्क साधूनही 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लावला गेल्यास थेट RBI च्या तक्रार व्यवस्थापन पोर्टल वर तक्रार करण्याची सूचनाही आम्हाला पाहायला मिळाली.
यासंदर्भात मीडिया रिपोर्ट्स संदर्भात शोधत असताना आम्हाला द हिंदूने 21 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट सापडला. यामध्ये आम्हाला अशाप्रकारची कोणतीही सूचना RBI ने केलेली नसल्याची माहिती मिळाली.
याच रिपोर्टमध्ये असा फॉर्म भरून घेण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला होता, मात्र तो मागे घेण्यात आला आहे. RBI ने अशाप्रकारे कोणतीही सक्ती केली नाही. अशी माहिती मिळाली आहे.
Conclusion
तुम्हाला ₹2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्यायच्या असल्यास विशिष्ट फॉर्म भरावा लागेल, असे सांगणारा दावा आमच्या तपासात खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
RBI Website
RBI Twitter Handle
Article published by The Hindu on May 22, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in