Tuesday, September 26, 2023
Tuesday, September 26, 2023

घरCoronavirusअभिनेता जावेद जाफरीने वादग्रस्त ट्विट केले?  जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

अभिनेता जावेद जाफरीने वादग्रस्त ट्विट केले?  जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

Claim- थुंकी लावून फळे आणि भाजी  विकणारे सगळे मुसलमान कोरोना पाॅझिटिव्ह नाहीत, पण तरीही काही हिंदू ग्राहक मुस्लिम विक्रेत्यांचा बहिष्कार करत आहेत- जावेद जाफरी

बाॅलिवुड अभिनेता जावेद जाफरीच्या ट्विटचा एक स्क्रिनशाॅट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून या ट्विटमध्ये जावेद जाफरीने हिंदूना असहिष्णू म्हटल्याचे दिसते.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये ?
 
जरूरी नहीं की थूक लगाकर फल और सब्जी बेच रहे सभी मुसलमान कोरोना पाॅडिटिव हो।  फिर भी कुछ हिंदू ग्राहक मुस्लिम विक्रेताओं का बहिष्कार कर नफरत फैला रहे हैं। इतने असहिष्णूं क्यों हैं आप
मराठी अनुवाद
थुंकी लावून फळं आणि भाज्या विकणारा प्रत्येक मुसलमान कोरोना पाॅझिटिव्ह नसतो, तरीही काही हिंदू ग्राहक मुस्लिम विक्रेत्यांचा बहिष्कार करतात करून दुश्मनी वाढवत आहेत. तुम्ही एव्हढे असहिष्णू का आहात ?
Verification
आम्ही या संदर्भात शोध सुरु केला. गूगलमध्ये काही कीवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला फेसबुक वर हाच स्क्रिनशाॅट शेअर केलेल्या पोस्ट आढळून आल्या.
आम्ही जावेद जाफरी ने असे वादग्रस्त ट्विट केले आहे का याचा शोध घेतला पण कुठेही अशा प्रकारची बातमी आढळून आले नाही. यानंतर आम्ही जावेद जाफरीचे ट्विटर अकाऊंट तपासले असता याविषयी स्पष्टिकरण देणारे ट्विट त्याने 17 एप्रिल रोजी केल्याचे आढळून आले. यात त्याने म्हटले आहे की, माझ्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्विटचा स्क्रिनशाॅट हा बनावट आहे. मी ट्विटमध्ये किंवा माझ्या भाषणांमध्ये नेहमीच जातीय आणि धार्मिक सलोख्यास प्रोत्साहन दिले आहे. आजच्या काळात सर्वांना मानवतेच्या शत्रू सोबत लढायचे आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, अभिनेता जावेद जाफरीच्या नावाने सोशल मीडियामध्ये ट्विटचा खोटा स्क्रिनशाॅट व्हायरल झाला आहे. सोशल मीडियात तो भ्रामक दाव्याने व्हायरल होत आहे.
Source 
Facebook Search
Twitter Advanced Search
ResultFalse 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular