Friday, July 19, 2024
Friday, July 19, 2024

HomeFact CheckViralसावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून विविध ग्रुपवर आणि पर्सनल चॅटवर हा मेसेज जोरदार पसरत आहे. गुलाबी अर्थात Pink Whatsapp हे व्हाट्सअप चे नवे फिचर आले असून यासंदर्भात योग्य ते अपडेट मिळविण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा असे व्हायरल मेसेज सांगतो. अनेक युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात शेयर करीत आहेत. विशेषतः हा मेसेज स्कॅम चा भाग असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर आहे. यापार्श्वभूमीवर Pink म्हणजेच गुलाबी व्हाट्सअप चा नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एक्सप्लेनर च्या माध्यमातून करणार आहोत.

व्हायरल मेसेज काय आहे?

व्हाट्सअप च्या या नव्या फिचर बद्दल सांगणारा हा मेसेज आम्हाला व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सापडला.

“Add New whatsapp features Try this and enjoy new look. https://s0l.site?=pink ” असे हा व्हायरल मेसेज सांगतो. व्हाट्सअप मध्ये अविश्वसनीय फीचर्स आली आहेत, तुमचे व्हाट्सअप अपडेट करा किंवा तुम्हाला हे माहिती आहे का? अशा सदराखाली असा मेसेज पसरताना आम्हाला दिसला.

आम्हाला व्हाट्सअप वगळता फेसबुकवर असे मेसेज आढळले नाहीत. दरम्यान आम्ही यासंदर्भात ट्विटर वर शोध घेतला, आम्हाला असे सर्च रिजल्ट मिळाले. महत्वाचे म्हणजे युजर्सनी या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. असेच आवाहन केल्याचे आम्हाला दिसून आले.

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे

खरे काय आहे?

व्हाट्सअप चे नवे फिचर आले आहे, लिंक दाबा आणि अपडेट करा, असे सांगणारा मेसेज खरा आहे? की, व्हाट्सअप संदर्भातील या मेसेजला किंवा त्यावरील लिंकला क्लिक करू नका. असे सांगणारे आवाहन खरे आहे? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आम्ही व्हाट्सअप कंपनीचे अधिकृत ट्विटर हॅन्डल @WhatsApp धुंडाळले. व्हाट्सअपने Pink Whatsapp असे कोणते नवे फिचर आणले आहे का? यासंदर्भात आम्ही शोधले. मात्र या नव्या फिचर संदर्भात किंवा पिंक व्हाट्सअप संदर्भात कोणतीही घोषणा केल्याचे आम्हाला आढळले नाही.

किवर्ड सर्च च्या माध्यमातून आम्ही शोधले असता, पिंक व्हाट्सअप हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती सर्वप्रथम १७ एप्रिल २०२१ रोजी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ Rajshekhar Rajaharia यांनी उघड केल्याचे आम्हाला निदर्शनास आले. व्हाट्सअप पिंक च्या नावाखाली एक व्हायरस पसरविला जात असून सावध राहा. असे आवाहन त्यांनी केले होते.

“व्हॉट्सअप पिंकपासून सावधान!! #WhatsApp वर तुम्हाला WhatsApp पिंक नावाचा मेसेज मिळेल ज्यात लिंक असेल. त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. असे केल्याने तुम्ही हॅकरला तुमच्या फोनचा संपूर्ण अक्सेस द्याल. सावध राहा… सगळ्यांना शेअर करा…” असा संदेश त्यांनी दिला होता.

मुंबई पोलिसांच्या NORTH REGION CYBER POLICE CRIME WING ने १६ जून २०२३ रोजी ट्विट करून यासंदर्भात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केल्याचेही आम्हाला पाहायला मिळाले.

अशा मेसेज मधील लिंकवर क्लिक केल्यास आपला फोन धोक्यात येऊन आपली संपूर्ण माहिती हॅकर्स च्या ताब्यात जाऊ शकते. त्यामुळे सावध राहा. असे आवाहन मुंबई पोलिसांनी केल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले. याचबरोबरीने विविध राज्यांच्या पोलीस यंत्रणांनीही याबद्दल जागृतीचे संदेश जारी केल्याचे आम्हाला दिसून आले.

सायबर तज्ञांचे मत काय?

व्हायरल मेसेज आणि त्याला विरोध करणारे मेसेज यासंदर्भात आम्ही सायबर तज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही इंटरनेट फ्रिडम फौंडेशन या इंटरनेटवरील गैरप्रकारांवर आवाज उठविणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या असोसिएट लिटिगेशन कौन्सल राधिका रॉय यांनी आम्हाला माहिती दिली. “अशा प्रकरणांमध्ये घोटाळेबाजांची कार्यपद्धती म्हणजे कमी माहिती असणाऱ्या युजर्सना ते एका विश्वासार्ह स्त्रोताशी संबंधित असल्याचा विश्वास देऊन फसवलेल्या लिंक्समध्ये प्रवेश करण्यासाठी लक्ष्य करणे. अभ्यासानुसार, बहुतेक ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी घोटाळ्यांच्या मुळाशी आहेत. तथापि, असे लोक जे जीवनातील असुरक्षित टप्पे अनुभवत आहेत, जसे की नोकरीच्या शोधात असणे किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनात उलथापालथ अनुभवणे, ते देखील घोटाळ्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते.”

“या प्रकरणात, लोकांना व्हॉट्सअपवर अतिरिक्त वैशिष्ट्ये/फायदे मिळवण्याच्या कल्पनेने प्रलोभन देऊन, घोटाळेबाज प्रत्यक्षात मालवेअरच्या वेशात असलेल्या लिंक्स प्रदान करतात. एकदा या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर, ते तुम्हाला अशा साइटवर फॉरवर्ड करते जे WhatsApp च्या मूळ वेबसाइटसारखे दिसण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. त्यानंतर, डाउनलोड लिंक बँकेच्या तपशीलांसह वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश प्रदान करते. ते फोटो, संपर्क आणि इतर डेटामध्ये देखील प्रवेश करू शकते.” असे त्यांनी सांगितले.

“या स्वरूपाच्या घोटाळ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या लिंक्समध्ये प्रवेश न करणे किंवा त्यावर क्लिक न करणे आणि नेहमी Google Play Store किंवा Apple वर App Store वरून अॅप्स स्थापित करणे चांगले आहे. (तथापि, Apple ला क्वचितच अशा समस्यांचा सामना करावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे की ते अज्ञात स्त्रोतांकडून अप्लिकेशन्स इंस्टॉल करण्याची परवानगी देत ​​नाही). पुढे, तुम्हाला प्राप्त होणारे संदेश खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करणे टाळा. मला विश्वास आहे की तुम्ही आधीच लिंक ऍक्सेस केली असल्यास काय करावे आणि अॅप ताबडतोब अनइंस्टॉल करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक सल्लाही जारी केला आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही सायबर सुरक्षा या विषयांचे अभ्यासक हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी आम्हाला महत्वाची माहिती दिली. सर्व युजर्सनी काही मुद्दे कायम लक्षात ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितलेले मुद्दे पुढीलप्रमाणे.

” व्हाट्सअप ने कोणतेही Pink नावाचे गुलाबी फिचर लॉन्च केलेले नाही. गुगल प्ले स्टोअर किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्म वर असे अप्लिकेशन उपलब्ध केले नाही. हा एक स्कॅम अर्थात फसवणुकीचा प्रकार आहे. व्हायरल मेसेज च्या माध्यमातून प्रसारित केली जाणारी लिंक हा मालवेअर आहे. अर्थात व्हायरस. अनेक युजर्सना आकर्षित करून घेण्यासाठी ही लिंक फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला जात असून यापासून सावध राहणे आवश्यक आहे. अशा लिंकच्या माध्यमातून संगणकी किंवा मोबाईल द्वारे उपलब्ध होणारी माहिती हॅक केली जाते. यामध्ये गोपनीय मेसेज, कॉन्टॅक्टस, गोपनीय पासवर्ड किंवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित युपीआय किंवा तत्सम माहिती पळविली आणि चोरली जाऊ शकते. दरम्यान या लिंकवर क्लिक केल्यास असे धोके निर्माण होऊ शकतात.

“एखाद्या अधिकृत स्त्रोताकडून आल्याशिवाय प्राप्त होणार्‍या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये, नेहमी सर्व माहिती चुकीची असल्याचे गृहीत धरा आणि आपल्या डिव्हाइसवर काहीही डाउनलोड करण्यापूर्वी खातरजमा करा,” तो जोडला.

हे फार महत्वाचे

व्हाट्सअप पिंक किंवा इतर कोणत्याही नावाखाली आपल्याला एकदा मेसेज आणि लिंक आल्यास काय करायला हवे याची माहिती आम्हाला हितेश धरमदासानी यांच्याकडून मिळाली असून हे फार महत्वाचे उपाय लक्षात घेण्यासारखे आहेत.

पायरी 1: धोका समजून घ्या

व्हॉट्सअप पिंक घोटाळा एका लिंकद्वारे चालतो जो अनेकदा ज्ञात किंवा अनोळखी व्यक्तींद्वारे पाठवला जातो. तुमच्या व्हॉट्सअप इंटरफेसचा रंग गुलाबी करण्यासाठी एक नवीन फीचर ऑफर करण्याचा दावा केला जात आहे. तथापि, हे स्कॅमर आपल्या संपर्क आणि गटांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि ती लिंक पुढे पसरवण्यासाठी या मेसेजचा वापर करतात.

पायरी 2: सतर्क रहा

संरक्षणाची पहिली पायरी म्हणजे व्हॉट्सअप वापरताना सतर्क आणि सावध राहणे. तुमच्या अॅपचा रंग बदलण्याचे आश्वासन देणारे, विशेषत: लिंक्स असलेल्या कोणत्याही संदेशांपासून सावध रहा. लक्षात ठेवा, कायदेशीर अपडेट्स किंवा कस्टमायझेशन सामान्यत: अधिकृत अॅप स्टोअर्स किंवा सत्यापित स्त्रोतांद्वारे उपलब्ध असतात.

पायरी 3: संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा

WhatsApp पिंक घोटाळ्याला बळी पडण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा, मग ते ज्ञात किंवा अज्ञात स्त्रोतांकडून आलेले असोत. या लिंकमध्ये मालवेअर किंवा दुर्भावनापूर्ण कोड असू शकतो जे तुमच्या डिव्हाइस आणि वैयक्तिक माहितीशी तडजोड करू शकतात.

पायरी 4: मेसेजच्या सत्यतेची खातरजमा करा

तुम्हाला व्हॉट्सअप पिंक वैशिष्ट्याबद्दल संदेश मिळाल्यास, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे महत्त्वाचे आहे. WhatsApp ची अधिकृत वेबसाइट किंवा विश्वसनीय वृत्त आउटलेट्स यांसारख्या अधिकृत स्त्रोतांसह माहिती क्रॉस-चेक करा. तुम्हाला दाव्याचे समर्थन करणारा कोणताही कायदेशीर पुरावा आढळला नाही तर, संदेशाकडे दुर्लक्ष करणे चांगले.

पायरी 5: इतरांना कळवा

WhatsApp पिंक सारख्या घोटाळ्यांचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे मित्र, कुटुंब आणि संपर्कांमध्ये जागरूकता वाढवणे. सोशल मीडिया, ईमेल किंवा थेट संभाषण यासारख्या विश्वसनीय संप्रेषण चॅनेलद्वारे घोटाळ्याची माहिती सामायिक करा. इतरांना सावध राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.

पायरी 6: तक्रार करा आणि ब्लॉक करा

तुम्‍हाला WhatsApp पिंक स्‍कॅम आढळल्‍यास किंवा त्यासंबंधित मेसेज येत असल्‍यास, व्‍हॉट्सअपकडे या समस्येची तक्रार Report करा. याव्यतिरिक्त, पुढील संपर्क किंवा संभाव्य घोटाळ्याचे प्रयत्न टाळण्यासाठी असे मेसेज पाठविणाऱ्याला ब्लॉक करा.


(इंटरनेट फ्रिडम फौंडेशनकडून प्रतिसाद मिळताच हे आर्टिकल अपडेट करण्यात आले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular