Authors
Claim
हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला.
Fact
व्हायरल व्हिडिओ हिंदू संताचा नसून श्रीलंकन बौद्ध भिक्षूचा आहे.
अर्धनग्न अवस्थेत एक पुरुष आणि दोन महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिला आणि पुरुष यांना मारहाण करीत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ देखील बनवत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स दावा करत आहेत की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती एक हिंदू संत आहे ज्याला लोकांनी महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे.
Fact Check/ Verification
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की हा व्हिडिओ संपादित केला गेला आहे आणि त्यात एका हिंदू संताचा व्हिडिओ जोडला गेला आहे, जो हिंदू राष्ट्र आणि उत्तराखंडमधील पुरोला येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देत आहे. इंटरनेटवर काही कीवर्ड शोधल्यानंतर आम्हाला कळले की त्या संताचे नाव स्वामी आनंद स्वरूप आहे. आमच्या तपासात, आम्हाला स्वामी आनंद स्वरूप यांच्या फेसबुक पेजवर नुकताच अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओचा काही भाग जोडण्यात आल्याचे व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट होते.
आमच्या तपासात, आम्हाला इतर अनेक मीडिया रिपोर्ट्स देखील सापडले, ज्यात स्वामी आनंद स्वरूप यांनी हिंदु राष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याबाबत बातम्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत. परंतु स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर असा कोणताही आरोप असल्याचा उल्लेख आम्हाला माध्यमांमध्ये आढळून आला नाही.
आम्ही व्हिडिओची कीफ्रेम उलट-शोधली. आम्हाला 8 जुलै 2023 रोजी श्रीलंकन मीडिया हाऊस एशियन मिररने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला, त्यानुसार ही घटना श्रीलंकेतील नवागामुवा येथील बोमिरिया भागात घडली होती.
वृत्तानुसार, पोलिसांनी बौद्ध भिक्खू पल्लगामा सुमना थेरो आणि दोन महिलांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली होती, परंतु सुमना थेरो यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर भिक्षूचे व्हिडिओ चित्रीकरण आणि मारहाण करणाऱ्याना सोडून देण्यात आले. न्यूजचेकरने पंजाबी आणि तमिळ भाषांमध्ये या दाव्याचे तथ्य तपासले आहे.
Conclusion
त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती हिंदू धर्मगुरू नसून श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू आहे.
Result: False
Our Sources
Asian Mirror report
Swami Anand Swaroop Fb Page
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in