Authors
Claim
पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. हे व्हायरल छायाचित्र काशी विश्वनाथ धामच्या बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधानांच्या भोजन कार्यक्रमादरम्यान काढण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा सोशल मीडियावर एक छायाचित्राच्या माध्यमातून केला जात आहे.
“ताजमहाल बांधणाऱ्या मंजुराचे हात तोडले होते. राममंदिर बांधणाऱ्या मजुरांबरोबर भोजन हे आहे संस्कार आणि हिंदूत्व.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
7 नोव्हेंबर 2023 रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार, 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात मूर्तीचा अभिषेक केला जाईल. ट्रस्टने 19 डिसेंबर 2023 रोजी शेअर केलेले ट्विट रामजन्मभूमीवरील मंदिराचे बांधकाम अद्याप सुरू असल्याची माहिती देते. मंदिर बांधणी आणि अभिषेक संबंधित हजारो पोस्ट सोशल मीडियावरही शेअर करण्यात आल्या आहेत. याच क्रमाने सोशल मीडिया युजर्स एक छायाचित्र शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांसोबत भोजन केले.
Fact Check/Verification
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या कामगारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भोजन केले असल्याच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही गुगलवर व्हायरल चित्र शोधले. या प्रक्रियेत, आम्हाला माहिती मिळाली की व्हायरल चित्र पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, व्हायरल झालेले चित्र 13 डिसेंबर 2021 चे आहे, जेव्हा काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी धामच्या बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांसोबत भोजन केले होते.
वरील माहितीच्या मदतीने, ट्विटरच्या अडवान्सड सर्च फीचरचा वापर करून, जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान शेअर केलेले ट्विट शोधले, तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की पंतप्रधानांनी देखील काशी विश्वनाथ धामच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांसोबत भोजन केले, असाच उल्लेख केला आहे.
याशिवाय, 13 डिसेंबर 2021 रोजी डीडी न्यूजने शेअर केलेल्या ट्विटमध्ये वर नमूद केलेल्या भोजन कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील उपस्थित आहे, ज्यामध्ये व्हायरल चित्रासारखी दृश्ये आहेत.
13 डिसेंबर 2021 रोजी ANI UP/Uttarakhand ने शेअर केलेल्या ट्विटमध्ये देखील भोजन कार्यक्रमाचे व्हिज्युअल पाहायला मिळतात.
व्हायरल झालेल्या चित्रावर नीट नजर टाकली तर त्यात काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट, वाराणसी असे लिहिलेले दिसते.
Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेल्या मजुरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजन केल्याचा दावा खोटा आहे. काशी विश्वनाथ धामच्या बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधानांच्या भोजन कार्यक्रमादरम्यान घेतलेले चित्र व्हायरल करून हा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.
Result: Partly False
Our Sources
Tweet shared by Prime Minister Narendra Modi on 13 December 2021
PMO India website
Tweets shared by DD News and ANI UP/Uttarakhand on 13 December 2021
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा