Thursday, July 18, 2024
Thursday, July 18, 2024

HomeFact CheckViralआंध्रप्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या नावाने जुना फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य

आंध्रप्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या नावाने जुना फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

आंध्रप्रदेशातील अमरावती येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावाने सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला आहे. यात एक महिला पोलिस कर्मचारी एका युवतीला केसांना पकडून ओढत नेत असल्याचे दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, आंध्र प्रदेशातील शेतकरी आपल्या जमिनी देतात आणि त्यांना अशा प्रकारे वागणूक मिळते. हे केवळ मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या राजवटीतच होऊ शकते.

वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या सरकारच्या तीन राजधान्यांच्या निर्णयाच्या विरोधात 12 ऑक्टोबर रोजी अमरावती येथे शेतकरी आंदोलनाचा 300 वा दिवस पूर्ण झाला. तिरुपती, अनंतपूर, राजामंड्री, कुरनूल या शहरांसह अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. अशातच सोशल मीडियावर आंदोलक युवतीचा फोटो व्हायरल झाला.

ट्विटर/ संग्रहित

Fact Check / Verification

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो अमरावतीमधील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आहे का याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने या फोटोचा शोध घेतला असता मॉडेल आणि अभिनेता कुशल टंडन यांनी ‘द कन्फ्युज्ड इंडियन’ या मथळ्यासह ऑक्टोबर 2015 मध्ये हा फोटो ट्विटरवर प्रथम शेअर केल्याचे आढळून आले कुशल टंडनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुन्हा काहीही असो, पण महिला पोलिस अधिका-याला आरोपी मुलीच्या केसाला पकडून ओढण्याचे अधिकार दिले जात नाहीत. या महिला अधिका-याला जो पर्यंत निलंबित केले जात नाही तो पर्यंत हा फोटो प्रसिद्ध करुया.

संग्रहित

आम्ही अधिक शोध घेतला असता विजयवाडा पोलिसांचे ट्विट आढळून आले, ज्यात म्हटले आहे की, व्हायरल फोटो शेतक-यांच्या आंदोलनाशी संबंधित नाहीत. जुने फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केले जात आहेत. पहिला फोटो 2015 मधील असून त्याचा आंध्रप्रदेश पोलिसांशी संबंध नाही. दुसरा फोटो 2017 मधील असून तो टुंडरुमधील मेगा फुडपार्डकच्या विरोधातील आंदोलनाचा आहे. खोट्या प्रचाराचा भाग म्हणून हे फोटो २०२० मध्ये प्रसारित केली जात आहेत. पूर्वी अशाच पोस्टवर आणि फेकन्यूज पसरविणार्‍या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पोस्ट संदर्भात देखील गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

आम्ही युवतीचा व्हायरल फोटोचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र हा फोटो जुना असल्याचे सिद्ध झाले.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, पाच वर्षांपूर्वीचा फोटो आंध्रप्रदेशातील अमरावतीत 300 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाचा म्हणून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Sources

विजयवाडा पोलिसांचे ट्विट- https://twitter.com/VjaCityPolice/status/1315660249412501504

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular