Authors
लोकसभा निवडणूक सुरु असताना सोशल मीडियावर अनेक फेक दाव्यांनी धुमाकूळ घातला. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन. असा दावा करण्यात आला. हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली. असा दावा करण्यात आला. मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले. असा दावा झाला. काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला. इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या तरुणांना काँग्रेस दरवर्षी एक लाख रुपये देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख डाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
बटाट्यापासून सोने काढणारी मशीन लावणार हे विधान राहुल गांधींचे आहे?
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली?
हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मुस्लिम अल्पसंख्यांकांचा पहिला हक्क असे मनमोहनसिंग म्हणाले?
मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले. असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.
काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहे का?
काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार नाही
इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या तरुणांना काँग्रेस दरवर्षी एक लाख रुपये देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा