Authors
Claim
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५ जून २०२४ रोजी बँकॉकला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटसाठी राहुल गांधी यांचा बोर्डिंग पास.
Fact
हा दावा खोटा आहे. ही एका विमानप्रवासावरील स्तंभलेखकाची २०१९ मध्ये काढलेल्या बोर्डिंग पासची एडिटेड इमेज आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जून रोजी बँकॉक, थायलंडसाठी विस्तारा फ्लाइटसाठी बुक केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित बोर्डिंग पासची प्रतिमा शेयर करत आहेत. ही व्हायरल प्रतिमा सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA साठी मोठ्या विजयाचा (३५० पेक्षा जास्त जागा) अंदाज वर्तवणाऱ्या अनेक एक्झिट पोलनंतर आली आहे.
ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते. आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) तथ्य तपासण्याची विनंती करीत हा दावा प्राप्त झाला आहे.
Fact Check/ Verification
बोर्डिंग पासवर दोन भिन्न फ्लाइट क्रमांक नमूद केले असल्याचे न्यूजचेकरच्या लक्षात आले, जे कदाचित डिजिटली बदलले गेले असावेत.
त्यानंतर आम्ही फोटोचा रिव्हर्स इमेज शोध चालवला, ज्यामुळे आम्हाला LiveFromALounge.com या स्तंभात समान प्रतिमा मिळाली. हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जो विमान वाहतूक, हॉटेल्स, प्रवासी अनुभव, लॉयल्टी प्रोग्राम आणि प्रवासाच्या ट्रेंडबद्दल बातम्या आणि दृश्ये प्रकाशित करतो.
७ ऑगस्ट २०१९ रोजी, “ऑनबोर्ड विस्तारा टू सिंगापूर: विस्ताराची पहिली आंतरराष्ट्रीय फ्लाईट!” असे शीर्षक असलेला स्तंभ आम्ही वाचला. Live From A Lounge चे संस्थापक आणि संपादक अजय अवताने यांनी तो लिहिलेला आहे. “२०१५ मध्ये विस्ताराची पहिली फ्लाइट आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाण करणार आहे, तसेच पहिल्या फ्लाइटमध्ये मी उड्डाण करणार आहे असा करार झाला होता. शेवटी, एअरलाइनने जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सची घोषणा केली आणि काल दिल्ली आणि सिंगापूर दरम्यान पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण झाले, ज्यातुन मी उड्डाण केले,” असे त्यांनी या स्थंभात लिहिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.
व्हायरल इमेजची (डावीकडे) Awtaney च्या बोर्डिंग पासच्या फोटोशी (उजवीकडे) केलेली तुलना पुष्टी करते की तीच प्रतिमा मॉर्फ केली गेली आहे.
आम्ही Awtaney यांच्याशी देखील संपर्क साधला, ज्यांनी सांगितले, “मी माझ्या वेबसाइट LiveFromALounge.com वरून मूळ प्रतिमा उचलून संपादित करण्यात आली होती याची पुष्टी करू शकतो. जुलै २०१९ मध्ये त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या निमित्ताने मी विस्तारासोबत दिल्ली आणि सिंगापूर दरम्यान उड्डाण केले.
Conclusion
व्हायरल इमेजमध्ये ५ जून रोजी बँकॉकला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटसाठी राहुल गांधींचा बोर्डिंग पास असल्याचा दावा खोटा आणि डिजिटली अल्टर्ड असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: Altered Media
Sources
LiveFromALounge.com column, August 7, 2019
Email from Ajay Awtaney, aviation columnist
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम कुशल एच. एम. यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा