Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact CheckViralफॅक्ट चेक: टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार? येथे जाणून घ्या...

फॅक्ट चेक: टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार? येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार आहे.
Fact

हा दावा खोटा आहे. टाटा मोटर्सने या दाव्याचा इन्कार केला आहे.

टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार असे सांगणारा दावा आम्हाला सोशल मीडियावर आढळला. टाटा नॅनो हा सर्वसामान्य भारतीयांसाठी कारचे स्वप्न पूर्ण करणारा प्रकल्प आता नवीन सिरीज घेऊन बाजारात येणार असा दावा झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष याकडे नक्कीच वेधले जात आहे.

फॅक्ट चेक: टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: Facebook/ Patil Rupesh

“दिवंगत रतन टाटा यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प “टाटा नॅनो” परत आल्याच्या बातम्यांनी वेग पकडला आहे. वृत्तानुसार, नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स लवकरच नवीन नॅनो लाँच करणार आहे. ही कार आता आधुनिक डिझाइन, उत्तम कामगिरी आणि उत्कृष्ट मायलेजसह बाजारात येईल. नवीन आवृत्तीमध्ये अपग्रेड केलेले 624cc पेट्रोल इंजिन असेल, जे 30 kmpl पर्यंत मायलेज देईल. नॅनोचे स्टायलिश लूक आणि कॉम्पॅक्ट डिझाईन शहरी ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. परवडणारी क्षमता आणि व्यावहारिकता यांचा हा नवा संगम तरुण आणि कुटुंबांना आकर्षित करेल.” असे दाव्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Fact Check/ Verification

दावा करताना त्यामध्ये एक कारचा फोटोसुद्धा वापरण्यात आहे. दरम्यान सर्वप्रथम आम्ही टाटा मोटर्स कंपनीने आपली अधिकृत वेबसाईट किंवा X खात्यावर यासंदर्भात काही घोषणा केली आहे का हे शोधून पाहिले पण आम्हाला तसे काहीच आढळले नाही. नवीन नॅनो कार संदर्भातील घोषणा कंपनीतर्फे करण्यात आल्याचे आम्हाला पाहायला मिळाले नाही.

दरम्यान यासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का? हे पाहण्याचाही प्रयत्न केला मात्र Google वर सुद्धा अशाप्रकारची कोणती बातमी अधिकृत माध्यमाने दिली असल्याचे दिसले नाही.

पुढील तपासासाठी आम्ही व्हायरल दाव्यात दिसणाऱ्या कारच्या चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता, आम्हाला सदर कार Toyota कंपनीची Aygo Pulse असल्याचे आमच्या निदर्शनास आले. म्हणजेच दुसऱ्या कंपनीच्या कारचा फोटो वापरून टाटा कंपनी नवीन नॅनो कार लाँच करणार असल्याचा दावा करण्यात येत असल्याचे उघड झाले. संबंधित फोटो टोयोटा च्या वेबसाईटवर पाहता येईल.

फॅक्ट चेक: टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार? येथे जाणून घ्या सत्य

दरम्यान आम्ही मेलच्या माध्यामातून टाटा मोटर्सशी संपर्क साधला. आम्हाला “आत्तापर्यंत Tata Nano मधील कोणत्याही नवीन उत्पादनाबाबत / लौंचिंग बाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. असे काही असल्यास आमच्या ग्राहकांना सर्व माहिती संबंधित वेळी आणि अधिकृत संप्रेषण माध्यमांद्वारे अद्ययावत ठेवू.” अशी माहिती देण्यात आली.

यावरून संबंधित दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात टाटा नॅनो नवीन रूपात लाँच केली जाणार असल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Self Analysis
Google Search
Official Website of Tata Motors
X Account of Tata Motors
Website of Tooyota
Conversation with Tata Motors


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular