Wednesday, July 17, 2024
Wednesday, July 17, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: शरद पवार यांची बैठक, मणिपूर हिंसाचार, दाऊद सोबत फोटोतील महिला...

Weekly Wrap: शरद पवार यांची बैठक, मणिपूर हिंसाचार, दाऊद सोबत फोटोतील महिला तसेच स्टेशन मास्टर शरीफला अटक व इतर फॅक्टचेक

मागील आठवडासुद्धा सोशल मीडियावरील विविध व्हायरल दाव्यान्नी चर्चेत राहिला. नाशिक येथून गायब झालेली तरुणी अश्विनी सोनावणेबद्दलचे दावे मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा एक फोटो शेयर करून फोटोमध्ये दिसणारी महिला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून अनेक दावे करण्यात आला. एका मुलीवर हिंसा होत असल्याचा व्हिडीओ मणिपूर हिंसाचाराशी जोडून व्हायरल झाला. वाराणसी येथे दलित मुलीने सहा मुस्लिमांची हत्या केली, असा दावा झाला. बालासोर येथील रेल्वे अपघाताला जबाबदार असलेल्या स्टेशन मास्टर शरीफ याला पश्चिम बंगाल येथील एका मदरशातून पकडले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप

नाशिक येथून अश्विनी देविदास सोनावणे ही मुलगी अचानक बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

फोटोत दाऊद इब्राहिमसोबत बसलेली महिला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत?

अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत त्याच्यासोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी पत्रकार सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

तरुणीसोबत होत असलेल्या क्रौर्याचा हा व्हिडीओ मणिपूरचा?

व्हिडिओ मणिपूरमधील कुकी ख्रिश्चन मुलीवर झालेल्या हल्ल्याचा आहे, असे सांगत एक दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.

दलित मुलीने 6 मुस्लिम तरुणांची हत्या केली?

वाराणसीमध्ये एका दलित हिंदू मुलीने बलात्कार आणि धर्मांतराची धमकी देणाऱ्या 6 मुस्लिम तरुणांचा गळा चिरून पलायन केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

हे संवाद शरद पवारांच्या बैठकीचे नव्हेत

विरोधी पक्षाची नेते मंडळी शरद पवाराच्या दिल्ली येथील घरी मोदीच्या विरोधात कीती खालच्या पातळीवर गेलेली आहे, असे सांगत एक संवाद असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उजेडात आले.

बालासोर रेल्वे अपघातातील कथित आरोपीला सीबीआय ने पकडले नाही

बालासोर रेल्वे अपघातास जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ पश्चिम बंगालच्या मदरशात लपला होता, त्याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आला.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular