Authors
Claim
एका चित्रात प्रियंका गांधींच्या बॅगवर ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ असे लिहिलेले दिसत आहे.
Fact
हे चित्र एडिटेड आहे. एडिटिंगच्या माध्यमातून प्रियंका गांधींना पॅलेस्टाईनऐवजी ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ अशा शब्दांची बॅग हातात धरल्याचे दाखवण्यात आले आहे.
काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी सध्या आपल्या हँडबॅगमुळे चर्चेत आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या हँडबॅगवर ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ असे लिहिलेले दिसत आहे. मात्र, तपासाअंती हा फोटो एडिट केल्याचे आढळून आले. वास्तविक त्यांच्या बॅगेवर ‘Palestine’ (पॅलेस्टाईन) असे लिहिले होते.
मराठी भाषेतून हा दावा व्हाट्सअपवर व्हायरल झाला असल्याचे पाहावयास मिळाले.
17 डिसेंबर 2024 रोजी, एका फेसबुक युजरने प्रियांका गांधींचा हँडबॅग धरलेला फोटो शेअर केला (संग्रहित). या चित्रात त्यांच्या हँडबॅगवर ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ असे लिहिलेले दिसत आहे. यासोबत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मुझे बांग्लादेशी हिंदुओं की परवाह नहीं है।’
Fact Check/ Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर प्रियंका गांधींच्या हँडबॅगवर ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ हे कीवर्ड शोधले. यादरम्यान या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही रिपोर्ट आढळला नाही.
Google वर “प्रियांका गांधी” आणि “बॅग” सारखे कीवर्ड शोधत असताना, 16 डिसेंबर 2024 रोजी इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये आम्हाला व्हायरल झालेल्या प्रतिमेसारखीच एक प्रतिमा मिळाली. रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा सोमवारी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या. या पिशवीवर ‘PALESTINE’ लिहिलेले असून पॅलेस्टिनींसोबत एकतेचे प्रतीकही असल्याचे आम्हाला आढळले. दोन्ही चित्रे जुळवल्यावर हे स्पष्ट होते की व्हायरल चित्र संपादित केले आहे. एडिटिंगच्या माध्यमातून प्रियंका गांधींना ‘PALESTINE’ ऐवजी ‘I don’t care about Bangladeshi Hindus’ ‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ असे शब्द असलेली हँडबॅग धरल्याचे दाखवण्यात आले आहे.
तपासादरम्यान, आम्हाला 16 डिसेंबर 2024 रोजी द हिंदूने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले एक समान चित्र देखील आढळले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “पॅलेस्टाईनच्या लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा सोमवारी संसदेत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या. एएनआयच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये वायनाडच्या खासदार संसदेच्या संकुलात पॅलेस्टाईनची पिशवी घेऊन जाताना दिसत आहे.
‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी घेऊन संसदेत गेल्याच्या एका दिवसानंतर प्रियंका गांधी ‘बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चन एकत्र उभे राहा’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या.
Conclusion
तपासादरम्यान, आम्हाला आढळले की काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या हँडबॅगचा फोटो एडिट करून खोटा दावा करण्यात आला आहे.
Result: Altered Photo
Sources
Report By India Today, Dated December 16, 2024
Instagram Post By The Hindu, Dated December 16, 2024
YouTube Video By ANI, Dated December 16, 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा