Sunday, June 23, 2024
Sunday, June 23, 2024

HomeFact Checkकंगणाच्या कार्यालयावर कारवाई आधी उद्धव ठाकरेंनी हिटलरचे दर्शन घेतले नाही, खोटा दावा...

कंगणाच्या कार्यालयावर कारवाई आधी उद्धव ठाकरेंनी हिटलरचे दर्शन घेतले नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बीएमसीने कंगणाच्या कार्यालयावर कारवाई करण्याआधी उद्धव ठाकरेंनी हिटलरचे दर्शन घेतले असल्यचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दाव्यानुसार बीएमसी चे अधिकारी कंगणा रानौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यासाठी निघाले होते त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिटलरच्या फोटोचे दर्शन घेतले. हिटलरचे दर्शन घेतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला.

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनतंर कंगणाने मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटू लागली आहे व इतर काही वक्तव्ये केली होती. याला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल्याने दोघांत वाकयुद्ध सुरु झाले. यातच बीएमसी ने कंगणाच्या कार्यालयावर कारवाई केली.

संग्रहित

Fact Check/Verification

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हिटलरच्या फोटो समोर माथा टेकल्याच्या फोटोचे काय सत्य याची पडताळणी करण्याचे ठरविले. हा फोटो नेमका कधीचा आहे याचा शोध सुरु केला. गूगलमध्ये काही किवर्डसच्या सहायाने तपासणा केली मात्र उद्धव ठाकरे यांनी हिटलरच्या फोटोचे दर्शन घेतल्यची बातमी कुठेही आढळून आली नाही.

यानंतर आम्ही रिव्हर्स इमेच्या सहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला ठाकरे यांचा फोटोसमोर नतमस्तक झाल्याचा अनेक बातम्या आढळून आल्या.

नोव्हेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या outlook च्या बातमीनुसार उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिता दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धाजली अर्पित केली असल्याचे म्हटले आहे. यात हिटलरच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.

livemint.com नावाच्या वेबसाईटवर देखील देखील ही बातमी प्रसिद्ध झाली होती यात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गेल्यावर्षीचा बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो एडिट करुन हिटलरचे दर्शन घेत असल्याचा खोटा दावा व्हायरल करण्यात आला आहे.

Result- Misleading

Sources

Mint- https://www.livemint.com/politics/news/uddhav-thackeray-the-gamechanger-of-maharashtra-politics-11574909267515.html

outlookindia- https://www.outlookindia.com/photos/people/uddhav-thackeray/8888/2?photo-212045#photo-212045#photo-212045

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular