Authors
Claim
तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने.
Fact
हा दावा खोटा आहे. मुबीना बेगम नामक महिला तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी पदावर नव्हती हे देवस्थानने स्पष्ट केले आहे. तसेच एका ज्वेलरी शोरूम मधून चोरीला गेलेल्या आणि वेल्लोर पोलिसांनी हस्तगत केलेल्या दागिन्यांचा व्हिडीओ खोटा दावा करून शेयर केला जात आहे.
तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने असा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेयर केला जात आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“तिरुपती प्रसादाचे लाडू गायी आणि डुकराच्या चरबीने कसे अपवित्र केले जातात हे आपण आधीच पाहिले आहे, आता मुबिना निश्का बेगमच्या घरातून आयकर अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या दागिन्यांची रक्कम तपासा, वायएसआर काँग्रेस जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात मुबिना तिरुपती देवस्थानममध्ये जनसंपर्क अधिकारी होत्या.” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.
Fact Check/ Verification
तपासाच्या सुरुवातीला आम्ही तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क प्रमुख मुबीना निश्का बेगम नावाच्या व्यक्तीवर कोणती धाड पडली आहे का? हे संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोधले. या दरम्यान आम्हाला ८ जानेवारी २०२५ रोजी तिरुपती देवस्थानने आपल्या X खात्यावरून केलेले एक ट्विट सापडले.
“खोटा प्रचार इशारा असत्य: टीटीडी पीआरओ कथित “मुबिना निश्का बेगम” यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्याबाबतचे दावे निराधार आहेत. तथ्य: TTD ने कधीही अशा व्यक्तीला कामावर ठेवले नाही. व्हायरल व्हिडिओ TTD शी संबंधित नाही. चेतावणी: खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” अशा कॅप्शनखाली तिरुपती देवस्थानने दाव्याचे खंडन केले असल्याचे आम्हाला दिसून आले. यावरून मुबीना बेगम नावाच्या व्यक्तीचा तिरुपती देवस्थानशी कोणताच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान व्हायरल व्हिडीओचे सत्य ओळखण्यासाठी आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. तमिळनाडूतील वेल्लोर येथील ज्वेलरी स्टोअरमध्ये झालेल्या दरोड्यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित केलेल्या बातमीत दागिन्यांचे समान चित्र आम्हाला पाहायला मिळाले.
२२ डिसेंबर २०२१ रोजीच्या द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, पोलिसांनी वेल्लोरमधील जोस अलुक्कास ज्वेलरी स्टोअररूम चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी ओडुकाथूर येथील स्मशानभूमीतून १५.९ किलो सोन्याचे दागिने आणि ८ कोटी रुपये किमतीचे हिरे जप्त केले आहेत.
या माहितीवरून आम्ही अधिक कीवर्ड सर्च केले असता, आम्हाला २२ डिसेंबर २०२१ रोजी बीबीसी न्यूज तमिळने पोस्ट केलेला एक व्हिडिओ आढळला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओतील समान व्हिज्युअल पाहायला मिळतात.
“तामिळनाडू पोलिसांच्या २१ डिसेंबर २०२१ रोजीच्या एक्स पोस्टमध्ये, वेल्लोरमधील जोस अलुक्कास ज्वेलरी दुकानातून लुटले गेलेले १० कोटी रुपयांचे १५.९ किलो सोन्याचे दागिने घटनेच्या पाच दिवसांत वेल्लोर जिल्हा विशेष दलाने शोधून काढले आणि त्याचे सर्वत्र कौतुक झाले,” असे तामिळनाडूचे पोलीस महासंचालक सी शैलेंद्र बाबू यांनी सांगितले. असे म्हटले आहे.
हाच दावा यापूर्वी तिरुपती देवस्थानच्या पुजाऱ्यावर धाड असे सांगून शेयर केला जात होता, त्यासंदर्भात न्यूजचेकरने कन्नड भाषेमध्ये केलेले फॅक्टचेक येथे वाचता येईल.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने हा दावा खोटा आहे. मुबीना बेगम नामक महिला तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी पदावर नव्हती हे देवस्थानने स्पष्ट केले आहे. तसेच एका ज्वेलरी शॉपमधून चोरीला गेलेल्या आणि वेल्लोर पोलिसांनी हस्तगत केलेल्या दागिन्यांचा व्हिडीओ खोटा दावा करून शेयर केला जात आहे.
Result: False
Our Sources
Tweet made by Tirupati Devsthan on January 8, 2025
News published by Indian Express on December 22, 2021
News published by BBC Tamil on December 21, 2021
Tweet made by Tamilnadu Police on December 21, 2021
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा