Thursday, December 12, 2024
Thursday, December 12, 2024

HomeFact Checkविदर्भातील आलेल्या टोळधाडीचा नाही हा व्हिडिओ, भ्रामक दावा व्हायरल

विदर्भातील आलेल्या टोळधाडीचा नाही हा व्हिडिओ, भ्रामक दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा- व्हायरल व्हिडिओ विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी गावात आलेल्या टोळधाडीचा आहे. 

उत्तर भारतातून आलेल्या टोळधाडीने महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही जिल्ह्यांत थैमान घातले आहे. शेतक-यांची पिके फस्त केली आहेत. सोशल मीडियात या टोळधाडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असाच एका गावात आलेल्या टोळधाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पडताळणी-  सोशल मीडियात व्हायरल होत असलेला टोळाधाडीचा व्हिडिओ विदर्भातीलच आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता फेसबुकवर हाच व्हिडिओ याच दाव्याने पोस्ट करण्यात आल्याचे आढळून आले. 

https://www.facebook.com/vijay.wakekar/videos/3019144314839110/

अर्काइव्ह

https://www.facebook.com/watch/?v=572212103710373

अर्काइव्ह

विदर्भात टोळधाड आल्याच्या अनेक बातम्या आढळून आल्या मात्र या एकाही बातमीत व्हायरल व्हिडिओशी मिळता जुळता व्हिडिओ आढळून आला नाही. 

यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओमधील काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला. या शोधादरम्यान आम्हाला टाईम्स आॅफ इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर 27 मे रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. यात हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूर येथील काही भागात आलेल्या टोळधाडीचा असल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय आणखी एका युटयूब चॅनलवर जयपूरमध्ये आलेल्या टोळधाडीचा व्हिडिओ आढळून आला. 

https://www.youtube.com/watch?v=IaEZdyAGuf4

याशिवाय आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाईटवर देखील जयपूरमध्ये टोळधाड आल्याची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, 2500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान टोळधाडीमुळे झाले आहे. 

यावरुन हेच स्पष्ट होते ही टोळधाडीचा व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील अमवरावती जिल्ह्यातील नसून राजस्थानमधील जयपूरचा आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Source
FacebookGoogle Reverse ImageYouTube
Result- Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular