दावा
”पंतप्रधान नरेंद्र मोदीनी 134 कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणा-या डाॅक्टरचे स्वत: स्वागत केले.”
टिकटाॅकवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नरेंद्र मोदी एका व्यक्तीचे स्वागत करताना दिसत आहेत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की पंतप्रधानांनी 134 कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणा-या डाॅक्टरचे स्वागत केले.
पडताळणी
आम्ही टिकटाॅकवर व्हायरल झालेल्या 15 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपची पडताळणी सुरु केली. याबाबत मुख्य प्रवाहातील माध्यमांत बातमी प्रसिद्ध झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दैनिक भास्करच्या वेबसाईटवर मार्च महिन्यातील एक बातमी आढळून आली ज्यात पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात कोरोनाशी लढणा-या डाॅक्टरांना प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे.

याव्यतिरिक्त आम्हाला पंतप्रधानांनी 134 कोरोना रुग्णांचे जीव वाचवणा-या डाॅक्टरांचे स्वागत केल्याची बातमी कुठेही आढळली नाही. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओमधून काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साह्याने शोध घेण्यास सुरुवात केली. यूट्यूबवर दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आढळून आला. ज्यातून ही 15 सेकंदाची क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भारतात आले होते त्यावेळचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत करत त्यांना अलिंगन दिले होते.
याशिवाय डीडी न्यूजच्या यूटयूब चॅनलवर देखील हा व्हिडिओ आढळून आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती ही कोरोना रुग्णांना वाचवणारे डाॅक्टर नसून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आहेत. हा व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे.
Source
TikTok, Google Reverse Image, Youtube
Result- Misleading