Saturday, June 15, 2024
Saturday, June 15, 2024

HomeFact Checkअमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या व्यासपीठावरून फटकारले नाही, चुकीचा दावा व्हायरल

अमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या व्यासपीठावरून फटकारले नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

अमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या व्यासपीठावरून फटकारले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पिलीभीत, खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सर्व प्रकारची चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती शेअर करण्यात आली होती.

चौथा टप्प्यातही फेक न्यूजचा ट्रेंड सुरु आहे. Newschecker ने सध्याच्या विधानसभा निवडणुकांबाबत केलेल्या विश्लेषणानुसार, लोकसंख्येच्या अधिकमुळे, आतापर्यंत निवडणुकीशी संबंधित सर्वाधिक खोट्या बातम्या उत्तर प्रदेशातून आल्या आहेत. मात्र, निवडणुकीदरम्यान ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या त्या सर्व राज्यांशी संबंधित फेक न्यूज दिसल्या. सोशल मीडिया यूजर्स सर्व व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपापल्या पक्षांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यादरम्यान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गृहमंत्री अमित शहा यांनी विकास न केल्याबद्दल फटकारले असल्याचा दावा सोशल मीडिया युजर्सनी एक व्हिडिओ शेअर करत केला आहे.

Fact Check/Verification

गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विकास न केल्याबद्दल फटकारताना शेअर केलेल्या या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी गुगलवर व्हिडिओची कीफ्रेम रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधली. तथापि, व्हिडिओच्या खराब गुणवत्तेमुळे, आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत इतर काही दाव्यांव्यतिरिक्त कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. व्हायरल व्हिडिओबद्दल शेअर केलेल्या काही पोस्टमध्ये काही युजर्सनी कमेंट्समध्ये हा कर्नाटकचा जुना व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.

अमित शहांनी
Google search results

व्हायरल व्हिडिओंबद्दल अधिक माहितीसाठी, आम्ही Twitter Advanced Search वैशिष्ट्याच्या मदतीने Twitter वर काही कीवर्ड शोधले. या प्रक्रियेत आम्हाला अमित शहा आणि भाजपच्या कर्नाटक युनिटने शेअर केलेले काही व्हिडिओ आढळले जे व्हायरल व्हिडिओसारखे आहेत.

वरील ट्विटच्या मदतीने आम्ही यूट्यूबवर ‘Amit shah addressing convention of Shakthi Kendra Pramukhs of Bengaluru division in Bengaluru’ हे किवर्ड शोधले असता 18 एप्रिल 2018 रोजी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत YouTube चॅनेलद्वारे शेअर केलेला व्हिडिओ प्राप्त झाला.

Youtube search results

भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेला हा व्हिडीओ ऐकल्यानंतर आम्हाला असे आढळून आले की, याच व्हिडीओचा 47 मिनिटे 22 सेकंदांवरून 47 मिनिटे 35 सेकंदांचा भाग कापून हा व्हायरल व्हिडिओ बनवण्यात आला आहे. 47 मिनिटे 22 सेकंदांनंतरच्या व्हिडिओमध्ये, जो भाग कापला गेला आहे त्याच्या आधी, अमित शाह 47 मिनिटे 19 सेकंदांनी “कुछ नहीं हुआ कर्नाटक में भाई…” असं म्हणताना एेकू येईल.

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विकास न केल्याबद्दल फटकारण्याच्या नावाखाली केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, गृहमंत्री अमित शाह यांनी 2018 मध्ये कर्नाटकातील तत्कालीन सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला होता. अमित शहांच्या या व्हिडिओचा काही भाग शेअर करून तो यूपी निवडणुकीदरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे.

Result: False Context

Our Sources

Tweet made by BJP Karnataka

Tweet made by Home Minister Amit Shah

YouTube video published by Bharatiya Janta Party


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular