दावा
कोंबड्यांमध्ये अॅपोकॅपलिप्ट नावाचा कोरोनापेक्षा भयंकर विषाणू अस्तित्वात आहे.
कोंबड्यामध्ये अॅपोकॅपलिप्ट नावाचा विषाणू असून तो कोरोनापेक्षा भयंकर आहे त्यामुळे हा विषाणू माणसांत पसरला तर अर्धे जग नष्ट होऊ शकते असे दावे करणा-या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यासाठी डाॅ. मायकल ग्रेगरी यांच्या पुस्तकाचा दाखला दिला जात आहे.

पडताळणी
कोंबड्यांमध्ये खरंच अॅपोकॅपलिप्ट नावाचा व्हायरस आढळून येतो का याबाबत पडताळणी सुरु केली. याबाबत गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या. ज्यात कोबंड्यातील या व्हायरसमुळे अर्धे जग नष्ट होण्याची शक्यता असण्याची माहिती देण्यात आली आहे.

नवभारत टाईम्स या हिंदी बातम्याचा वेबसाईवट देखील ही बातमी प्रसिद्ध झाली असून यात म्हटले आहे की, संपूर्ण जग आता कोविड- 19 चा सामना करत आहे पण याच्यावर आतापर्यंत उपचार सापडलेले नाहीत. अशातच आॅस्ट्रेलियातील हेल्थ एक्सपर्ट आणि वैज्ञानिक मायकल ग्रेगर यांनी लोकांना सावध करत म्हटले आहे की चिकनचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन थांबवणे गरजेचे आहे. आज ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चिकन फार्मिंग होत आहे ते एक घातक महामारीचे कारण होऊ शकते. ही महारामारी कोरोनापेक्षा घातक आणि जीवघेणी असेल. अर्धे जग यामुळे नष्ट होऊ शकते.

दैनिक पुढारीच्या वेबसाईवर देखील या व्हायरस संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली आहे.
या व्हायरसबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही प्राण्यांच्या आरोग्यावर संशोधन करणा-या OIE या संस्थेच्या वेबसाईटला भेट दिली मात्र आम्हाला अॅपोकॅलिप्टिक व्हायरस बद्दल माहिती आढळून आली नाही.
माहिती व जनसंपर्क संचालनालयाने देखील कोंबड्यामंध्ये असा कोणाताही व्हायरस नसल्याची माहिती ट्विटवर दिली आहे.
याशिवाय महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की,पोल्ट्रीमध्ये करोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहार तज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देवून एका वृत्तवाहिनेमध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

यावरुन हेच स्पष्ट होते की कोंबड्यामध्ये अॅपोकॅलिप्टीक नावाचा व्हायरस अस्तित्वात असल्याचा दावा भ्रामक आहे.
Source
Google Search, Twitter Advanced Search
Result– Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)