दावा- महाआघाडी सरकारवर टीका टिप्पणी केल्यास सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
राजकीय टीकाकार पुष्पेंद्र यांनी ट्विटरवर दावा केला आहे की ठाकरे सरकार (महाआघाडी) विरोधात टीका टिप्पणी केल्यास सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो याच न्यायाने केंद्र सरकारवर टिका टिप्पणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलाने देखील तुरुंगात जायला हवे? असा प्रश्न देखील विचारला आहे.
पडताळणी- ठाकरे सरकारने खरंच असा काही आदेश जारी केला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसचा वापर केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारसंदर्भातील अनेक बातम्या दिसून आल्या.

मात्र या बातम्यांमध्ये कुठेच सरकारवर टीका केल्यास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा केली जाणार असल्याचा उल्लेख नाही. आम्ही या संदर्भात महाराष्ट्र सरकारने काही आदेश जारी केला आहे का याचा शोध घेण्याचा शोध घेतला. गृह विभागाच्या वेबसाईटला भेट दिली असता तेथे अशा प्रकारचा कोणताही आदेश आढळून आला नाही.

मुख्यमंत्री यांनी याबाबत ट्विटरवर काही माहिती दिली आहे का याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली पण मुख्यमंत्र्यांनी सरकावर टिका टिप्पणी करणा-यांना 6 महीने कारावासाची शिक्षा करणार असल्याचे कोणतेही ट्विट केल्याचे आढळून आले नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकताच राज्यातील जनतेशी कोरोना संदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता त्यावेळी देखील त्यांनी असा कोणता आदेश किंवा इशारा दिला नव्हता.
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल ट्विटमधील दावा असत्य आहे. सोशल मीडियात या ट्विट द्वारे भ्रामक माहिती पसरवत आहे.
Source
Twitter, Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)