Wednesday, September 27, 2023
Wednesday, September 27, 2023

घरFact Checkपतंगाच्या दोरीत अडकून उडालेल्या मुलीचा व्हिडीओ भारतातील नाही

पतंगाच्या दोरीत अडकून उडालेल्या मुलीचा व्हिडीओ भारतातील नाही

पतंगाच्या दोरीत अडकून उंच उडालेल्या आणि सुदैवाने बचावलेल्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना भारतात घडल्याचे सांगून युजर्स हा व्हिडीओ शेयर करीत आहेत. एक लहान मुलगी पतंगासोबत उडून गेली. अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर होतोय. मकर संक्रांतीच्या अनुषंगाने सर्वत्र पतंग महोत्सव होत असतात. याचाच आधार घेऊन हा दावा केला जात आहे.

अहमदाबाद येथे ही घटना झाल्याचे सांगून हा व्हिडीओ विविध भाषांमधून शेयर केला जात आहे.

Fact Check/ Verification

या दाव्याची सत्यता शोधण्यासाठी आम्ही हे दावे सोशल मीडियावर केले जात असलेल्या तारखांकडे लक्ष दिले. हे दावे संक्रांतीच्या तोंडावर आणि त्यानंतर झाले असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून अशी घटना कोठे झाली आहे का? याचा शोध घेतला असता, आम्हाला मराठी भाषेतून हा दावा २०२० साली २ सप्टेंबर रोजीही केला गेला असल्याचे दिसून आले.

#पतंगासोबत लहान मुलगी पण हवेत उडाली…काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली. यावरून ही घटना कुठे घडली हे समजले नसले तरीही ही घटना आत्ताची नसून दोन वर्षे जुनी असल्याचे आम्हाला दिसून आले. आम्ही त्यादृष्टीने या घटनेचा शोध घेतला. आम्ही Invid वापरून व्हिडिओला कीफ्रेममध्ये रूपांतरित केले. एक कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज शोध घेतला. आम्हाला ‘द गार्डियन’ च्या वेबसाईटवर दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला एक रिपोर्ट सापडला, त्यानुसार हा व्हिडिओ तैवानच्या सिंचू शहरातील आहे. तैवानमध्ये एका पतंग महोत्सवादरम्यान तीन वर्षांची मुलगी पतंगाच्या धाग्यात अडकली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या मुलीला वाचवले होते.

३१ ऑगस्ट २०२० रोजी, टुडे या वृत्तवाहिनीने देखील हा व्हायरल व्हिडिओ तैवान येथील असल्याचे म्हटले आहे. एका सणाच्या वेळी पतंगाचा दोरा तिच्या गळ्यात अडकल्याने तीन वर्षांच्या मुलीला हवेत सुमारे 30 सेकंद लटकावे लागले होते, असे व्हिडिओ रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला वाचवले.

आम्हाला असोसिएटेड प्रेस ने ३० ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केलेले एक आर्टिकल सापडले. यामध्ये ती मुलगी “पतंगाच्या दोरीत अडकल्यानंतर आणि हवेत कित्येक मीटर उंच उडत गेल्यानंतर सुरक्षित असल्याचे” सांगण्यात आले आहे.

पतंगाच्या दोरीत अडकलेल्या आणि सुदैवाने बचावलेल्या मुलीचा व्हिडीओ भारतातील आहे.
Screengrab of Associated Press

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की तैवानचा सुमारे २ वर्षे जुना व्हिडिओ भारतातील अहमदाबादचा म्हणून शेअर केला जात आहे. या व्हिडीओचे कुठूनही भारतीय कनेक्शन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources

Report Published on The Guardian

Youtube Video by Today

Report Published by Associated Press


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular