Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact CheckWeekly wrap: शेतकरी आंदोलन संपल्यानंतरचा फोटो ते ठाकरे सरकारची महिलांसाठी मोफत राईड,...

Weekly wrap: शेतकरी आंदोलन संपल्यानंतरचा फोटो ते ठाकरे सरकारची महिलांसाठी मोफत राईड, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

व्हायरल फोटो केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी घराकडे परततानाचा आहे?

व्हायरल फोटो केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी घराकडे परततानाचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने व इतर मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा करत लवकरच आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला. पण हा फोटो शेतकरी आंदोलन संपल्यानंतरचा नाही. फॅक्ट चेक इथे वाचा.

पत्रकार रवीश कुमार यांनी बिपीन रावत यांच्या पत्नीच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीबाबत प्रश्न केला?

सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर एनडीटीव्ही इंडियाचे अँकर रवीश कुमार यांनी बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका यांच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, या क्रूर अपघातानंतरही रवीश कुमार प्रश्न करत आहेत. पण हे खरे नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू?

राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाल आहे. कोरोनाच्या ओमीक्रॅन व्हेरिएंटचे काही रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याच दरम्यान हा दावा व्हायरल झाला आहे. व्यापारी दुकानदाराची वेळ सकाळी 9 ते रात्री 8, दुकानदार व्यापारी आणि ग्राहकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

ठाकरे सरकारने महिलांसाठी रात्रीची विनामुल्य राईड सुरु केली आहे?

सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आला आहे की, ठाकरे सरकारने रात्री एकट्या महिलांना घरी पोहचण्यासाठी विनामुल्य राईड उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल.महाराष्ट्र पोलिसांनी 7837018555 ही हेल्पलाईन महिलासांठी सुरु केलेली नाही. व्हायरल होत असलेला दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular