Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्या आहेत. त्याचे सेवन केल्यास लहान मुलांना अर्धांगवायू होतो.
Fact
ल्युपो नावाच्या केकमध्ये औषधाची गोळी सापडल्याचा दावा केला जाणारा व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर २०१९ पासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सध्या भारतात या चॉकलेटची विक्री होत असल्याच्या बातम्या नाहीत. तसेच ही घटना २०१९ मधील आहे.
सध्या एक व्हिडीओ व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. ल्युपो कंपनीचा केक अतिशय घातक आहे. त्यामध्ये काही गोळ्या आढळल्या असून हा केक खाणाऱ्या मुलांना अर्धांगवायू होऊ शकतो. असा दावा केला जात आहे. “नवीन केक बाजारात आला आहे. ल्युपो कंपनीचा एक टॅबलेट आहे जो लहान मुलांना अर्धांगवायू करतो, कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या.” असे हा दावा सांगतो.
न्यूजचेकरने या दाव्यासंदर्भात तपासणी करून २२ ऑगस्ट २०२२ रोजी फॅक्टचेक प्रसिद्ध केले आहे. ते इथे वाचता येईल. आता पुन्हा एकदा हा दावा व्हायरल होत असल्याने आम्ही यासंदर्भातील तथ्य पडताळणीची पुन्हा एकदा उजळणी केली. अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ल्युपो नावाच्या केकमध्ये औषधाची गोळी सापडल्याचा दावा केला जाणारा व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर २०१९ पासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सध्या भारतात या केकची विक्री होत असल्याच्या बातम्या नाहीत. तसेच ही घटना २०१९ मधील आहे. हा दिशाभूल करणारा व्हिडिओ विविध दाव्यांसह वेगवेगळ्या देशांमध्ये अनेकदा व्हायरल झाला आहे. असे आमच्या लक्षात आले.
Our Sources
Fact check published by teyit.org and snopes.com in November 2019
Amazon website in Saudi Arabia
Gulf News published in December 2019
(अस्वीकरण: हे आर्टिकल न्यूजचेकर मराठीने २२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केले आहे. दावा पुन्हा व्हायरल झाल्याने ते पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
December 31, 2024
Sabloo Thomas
September 26, 2024
Prasad S Prabhu
August 22, 2024