Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap: या आठवड्यात 'गो बॅक मोदी' सह अन्य काही व्हायरल झालेल्या...

Weekly Wrap: या आठवड्यात ‘गो बॅक मोदी’ सह अन्य काही व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी 

रस्त्यावर मोठ्या अक्षरांत ‘गो बॅक मोदी’ असा लिहिलेला फोटो तामिळनाडूतील आहे, तसेच पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरग्रस्त होतील, असं डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणात म्हटलंय. असा दावा केला जात होता. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते संक्षिप्तपणे इथे वाचू शकता. 

सोशल मीडियावर ‘गो बॅक मोदी’चा व्हायरल होणारा फोटो खरंच तामिळनाडूतील आहे ? याचे सत्य जाणून घ्या 

‘गो बॅक मोदी’ हा फोटो तामिळनाडूमधील आहे, असा दावा केला जात होता. पण हा दावा चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल फोटोत सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी गोल्डी ब्रार खरंच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत उभा आहे? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्यात सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी गोल्डी ब्रार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत उभा आहे, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल होणारा व्हिडिओ खरंच ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील आहे ? याचे सत्य जाणून घ्या 

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ ज्ञानवापी सर्वेक्षणाचा आहे, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत खरंच कॅन्सरग्रस्त होतील ? याचे सत्य जाणून घ्या 

पिशवीतील दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरग्रस्त होतील, असा डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणात सांगितलंय. असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular