Friday, October 11, 2024
Friday, October 11, 2024

HomeFact Checkमोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी...

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मध्यरात्री कॉस्मिक किरण पृथ्वीजवळून जातील सावध राहा.
Fact
कॉस्मिक रेडिएशनचे परिणाम टाळण्यासाठी किंवा सावध राहण्यासाठी नासा, सीएनएन किंवा Google द्वारे कोणतेही संदेश जारी केलेले नाहीत.

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, प्रत्येकाने आपले मोबाईल दूर किंवा बंद ठेवावे कारण मध्यरात्री कॉस्मिक (वैश्विक) किरण पृथ्वीच्या फार जवळ जाणार आहेत. असे म्हटलेले आहे. हा व्हायरल मेसेज व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक ग्रुपवर मोठ्याप्रमाणात शेअर झाला आहे.

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा
Courtesy: Facebook/ Vishwas Ketkar
मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा
Courtesy: Twitter@Majorshubham_

“महत्वाची माहिती: प्रिय मंडळी, आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत, तुमचे सेल्युलर फोन, टॅब्लेट इ. बंद करण्याचे सुनिश्चित करा आणि ते तुमच्या शरीरापासून दूर ठेवा. सीएनएन टेलिव्हिजनने ही माहिती दिली आहे. कृपया आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगा. आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत, कारण आपला ग्रह खूप जास्त रेडिएशन उत्सर्जित करेल. वैश्विक किरण पृथ्वीच्या जवळून जातील. त्यामुळे कृपया तुमचे मोबाईल बंद करा. तुमचे डिव्हाइस तुमच्या शरीराजवळ सोडू नका, यामुळे तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते. Google, NASA आणि BBC बातम्या पहा. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व लोकांना हा संदेश पाठवा. तुम्ही लाखो लोकांचे जीव वाचवाल.” असे व्हायरल मेसेज सांगतो.

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला.

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा

Fact Check/ Verification

मध्यरात्री कॉस्मिक किरण पृथ्वीच्या जवळून जातील असा दावा करणाऱ्या व्हायरल मेसेजवर गुगल कीवर्ड सर्च केल्यावर असे दिसून आले की व्हायरल मेसेज 2008 पासून इंटरनेटवर फिरत आहे. 2010 मध्ये, घानामध्ये बीबीसी न्यूजच्या नावाने असाच एक मेसेज व्हायरल होत होता. जिथे दुपारी 12.30 ते 3.30 च्या दरम्यान वैश्विक किरण पृथ्वीवर पडतील असे सांगण्यात आले होते.

या व्हायरल मेसेजबद्दल बीबीसीने खुलासा केला आहे की असा कोणताही इशारा किंवा संदेश जारी करण्यात आलेला नाही. ही केवळ अफवा असून मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा
Screengrab of BBC

याशिवाय नासाने जारी केलेल्या कोणत्याही बातमीत या व्हायरल मेसेजशी संबंधित कोणतीही माहिती नाही. पण, नासाने आपल्या वेबसाईटवर कॉस्मिक किरणांची माहिती दिली आहे. कॉस्मिक किरण हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे उच्च-ऊर्जेचे रेणू आहेत जे प्रकाशाच्या वेगाने दुधाळ मार्गातून जातात आणि आपल्या सौरमालेपर्यंत पोहोचतात.

वैश्विक किरण काय आहेत?

नासाच्या वेबसाईटनुसार, जेव्हा कॉस्मिक किरणांचा मूळ शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञांनी त्यांना सूर्यप्रकाशासारखे किरण मानले आणि त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला. कॉस्मिक किरण हे खरे तर दूरच्या आणि प्राचीन ताऱ्यांवरील सुपरनोव्हा स्फोट घटनांद्वारे उत्सर्जित होणारे छोटे रेणू किंवा कण आहेत.

याशिवाय, नासाने एक वेबसाइट विकसित केली आहे जी यूएसए, मिनेसोटा येथे सापडलेल्या वैश्विक किरणांवर दर 15 सेकंदांनी फोटो अपडेट करते. नासा आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) सारख्या संस्थांकडून कॉस्मिक किरणांबद्दल सतत इशारे दिले जातात.

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा

विश्वकिरणांचा पृथ्वीवरील जीवनाला थेट धोका नाही. मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ ठेवल्याने धोका वाढत नाही, असे या वेबसाइटवरील माहितीत म्हटले आहे. कोणत्याही ग्रहाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण सौर आणि वैश्विक किरणोत्सर्गाच्या संपूर्ण प्रभावापासून ग्रहावरील जीवनाचे रक्षण करते. अशी माहिती आम्हाला मिळाली.

आमच्या तपासात सीएनएन टेलिव्हिजन किंवा गुगल ने अशा बातम्या किंवा माहिती प्रसारित केल्याचे आम्हाला आढळले नाही.

यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही बनारस हिंदू विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभय कुमार यांच्याशी संपर्क साधला. हा दावा त्यांनी फेटाळला आहे. त्यांनी आम्हाला सांगितले, “वैश्विक किरण संदर्भात अशी कोणतीही माहिती नाही. संदेशात केलेले दावे दिशाभूल करणारे आहेत.”

Conclusion

मध्यरात्री वैश्विक किरण पृथ्वीच्या जवळून जातील हा दावा भ्रामक आहे. कॉस्मिक रेडिएशनचे परिणाम टाळण्यासाठी किंवा सावध राहण्यासाठी नासा, सीएनएन टेलिव्हिजन किंवा Google द्वारे कोणतेही संदेश जारी केलेले नाहीत.

Result : False

Our Sources
Official Website Of NASA
Official Website Of NOAA
Google Research
Conversation with Professor of Physics Banaras Hindu University Mr. Abhaykumar

(Inputs by Prathmesh Khunt & Shubham Singh)


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular