Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact Checkशिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला मारहाण केली नाही, चुकीचा दावा व्हायरल

शिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला मारहाण केली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर येथे एका बॅंक मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, शिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला मारहाण केली आहे. या दाव्याने व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हीच का लोकशाही असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.

याशिवाय हा व्हिडिओ यूट्यूबवर देखील याच दाव्याने व्हायरल झाल्याचे आढळून आले.

https://www.youtube.com/watch?v=QZUvlD8ZaBc

हा व्हिडिओ याच दाव्याने फेसबुक वर देखील व्हायरल झाला आहे.

Fact Check/Verification

शिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला खरंच मारहाण केली का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला एक स्थानिक मीडिया रिपोर्ट आढळून आला. यात म्हटले आहे की, ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. बातमीनुसार, युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. बँक मॅनेजर देवीदास घाटे यांना युवक कॉंग्रेस तालुका प्रमुख संभाजी शिर्के आणि कॉंग्रेस तालुका चौधरी बंधूसह युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मारहाण केल्याचे म्हटले.

याशिवाय आम्हाला न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा देखील व्हिडिओ आढळून आला. ज्यात म्हटले आहे की, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅंक मॅनेजरला मारहाण करण्यात आली.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की मलकापूर येथे आयडीबाआयच्या मॅनेजरला शिवसैनिकांनी नाही तक युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीं मारहाण केली आहे.

Result- Misleading

Sources

न्यूज 18 लोकमत- https://www.youtube.com/watch?v=H8kCCiZsnPQ

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular