Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact CheckViralआबू सालेमच्या भावासोबत नाही कंगणा रानौतचा फोटो, जाणून घ्या सत्य

आबू सालेमच्या भावासोबत नाही कंगणा रानौतचा फोटो, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

अंडरवर्ल्ड डाॅन आबू सालेम सारख्या दिसणा-या व्यक्ती सोबत कंगणा रानौतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, आबू सालेमच्या भावासोबत कंगणा रानौतचा फोटो आहे. पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या राज्यापालाना उद्देश्यून म्हटले आहे की, तुम्ही राजभवनावर पाहुणचार केलेली तुमची खास पाहुणी अबू सालेमच्या भावासोबत अशी नशा करायची?राजभवनची शान घालवली तुम्ही!म्हातारचळ म्हणतात याला.

संग्रहित

याशिवाय ट्विटरलर हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आढळून आले.

संग्रहित

Fact Check/Verification

कंगणा रानौत खरंच आबू सालेमच्या भावासोबत नशा करत होती का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगल काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला. मात्र आम्हाला या संदर्भात बातमी आढळली नाही. यानंतर आम्ही रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून हा फोटो शोधला असता आम्हाला www.huffingtonpost.in नावाच्या वेबसाईटवर 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात हा फोटो आढळला. या लेखाचे शीर्षक आहे, “आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ती खूपच प्रतिभावान आहे हे कंगना रनौतला समजलेच पाहिजे.” हा लेख कंगना सोबत फोटोत दिसणारे पत्रकार मार्क मॅन्युएल यांनी लिहिले आहे.

मार्क मॅन्युएल यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर देखील कंगणासोबतचा फोटो शेअर केला होता.

https://www.facebook.com/mark.manuel.332/posts/10154846574685911
https://www.instagram.com/p/BZDPJprgL32/

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, कंगणा रानौत चा पत्रकार मार्क यांच्या सोबतचा 2017 मधील फोटो अंडरवर्ल्ड डाॅन आबू सालेम यांच्या भावसोबतचा म्हणून खोट्या दाव्याने व्हायरल करण्यात आला आहे.

Result- Misleading

Sources

huffingtonpost- https://www.huffingtonpost.in/mark-manuel/kangana-ranaut-should-realise-she-s-too-talented-to-milk-her-personal-life-for-attention_a_23210081/

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular