एप्रिल महिन्याचा चौथा आठवडा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधीत दाव्यांनी गाजला. दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानमध्ये गोळीबार झाला, असा दावा करण्यात आला. एक व्हिडिओ शेयर करीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशी यांचा आहे, असा दावा करण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे छायाचित्र, असा दावा एका चित्राच्या माध्यमातून करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांची खरी यादी, असा दावा करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा फोटो, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तान गोळीबार झाला?
दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानमध्ये गोळीबार झाला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशी यांचा हा व्हिडीओ नाही
एक व्हिडिओ शेयर करीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशी यांचा आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

हे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे छायाचित्र नाही
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे छायाचित्र, असा दावा एका चित्राच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांची ही खरी यादी नाही
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांची खरी यादी, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा पहिला फोटो आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा फोटो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.