Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी...

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

गेल्या आठवड्यात खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरविणारे दावे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदार पदावरून अपात्र ठरविले गेल्यानंतर त्यांनीच अपात्रता विरोधी विधेयक फाडले होते. असा दावा करण्यात आला. राहुल गांधींनी सावरकरांच्या नातवाच्या इशाऱ्यानंतर त्यांच्याबद्दलचे सर्व ट्विट्स रद्द केले असाही दावा झाला. गोवा राज्यात बनावट काजू तयार केले जातात असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला. युपीआय पेमेंट करताना ₹2000 च्या खरेदीवर वाढीव कर भरावा लागणार असा दावा करण्यात आला. एका जुन्या घटनेचा संदर्भ घेऊन तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्थांवर आयटी ने छापा मारल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येईल.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

गोव्यात बनते बनावट काजू?

एक व्हिडीओ शेयर करीत गोवा राज्यात बनावट काजू बनविण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

राहुल गांधींनी ते विधेयक फाडले?

शिक्षा झालेल्या आमदार आणि खासदारांना अपात्र ठरविण्याच्या विरोधातील विधेयक संसदेत मांडले जाणार होते. मात्र राहुल गांधींनी ते फाडून टाकले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

सावरकरांवरील ट्विट्स हटविले नाहीत

सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी इशारा देताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याबद्दलचे ट्विट्स हटविले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले आहे.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

युपीआय बद्दलचा तो समज खोटा

युपीआय पेमेंट करताना ₹2000 च्या खरेदीवर वाढीव कर भरावा लागणार असा दावा करण्यात आला. मात्र आमच्या तपासात हा दावा आणि सर्वसामान्य जनतेत निर्माण करण्यात आलेला समज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

तिरुपती मंदिराच्या विश्वस्थांवर धाड कधी पडली?

तिरुपती तिरुमला मंदिराच्या विश्वस्थांवर भली मोठी धाड पडली असा दावा करून मंदिराला दान करणाऱ्या भक्तांनी आपल्या पैशांची काळजी घ्यावी असा दावा करण्यात आला. मात्र आमच्या तपासात नोटबंदीनंतर पडलेल्या त्या धाडीचे प्रकरण बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular