Wednesday, October 4, 2023
Wednesday, October 4, 2023

घरFact CheckFact Check: हा व्हायरल फोटो कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभाचा आहे का?

Fact Check: हा व्हायरल फोटो कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभाचा आहे का?

Claim
चित्रात दिसणारा स्तंभ हा मुघलांनी बांधलेल्या कुतुबमिनारमध्ये स्थापित केलेल्या प्रसिद्ध लोखंडी स्तंभाचा आहे, ज्यावर मुघलांच्या पूर्वजांची नावे कोरलेली आहेत.

Fact
प्रत्यक्षात व्हायरल चित्रात दिसणारा स्तंभ हा भरतपूर येथील लोखंडी स्थंभाचा आहे. आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे कि कुटूंब मिनार वर अशाप्रकारे नावे कोरलेली नाहीत. आणि कुतुबमिनारचे बांधकाम मुघलांनी केलेले नाही.

सोशल मीडियावर लोखंडी खांबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की चित्रात दिसणारा स्तंभ हा मुघलांनी बांधलेल्या कुतुब मिनारमध्ये स्थापित केलेल्या प्रसिद्ध लोखंडी स्तंभाचा आहे, ज्यावर मुघलांच्या पूर्वजांची नावे कोरलेली आहेत.

ट्विटरवर, गोपाल गोस्वामी नावाच्या एका युजरने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोखंडी स्तंभाचे छायाचित्र शेअर करत असा दावा केला आहे की “कुतुबमिनार मुघलांनी बांधला होता, याचा पुरावा मुघलांनी कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभावर त्यांच्या पूर्वजांची नावे लिहिली आहेत.”

आणखी एका ट्विटर युजर @jagadishexplore ने देखील दावा केला की “कुतुबमिनार मुघलांनी बांधला होता, पुरावा म्हणून कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभावर मुघल पूर्वजांची नावे लिहिली आहेत, विश्वास बसत नसेल तर झूम इन करा. आणि आजही आपण त्याला कुतुबमिनार म्हणतो.”

व्हायरल पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact check

रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने चित्राचे परीक्षण केल्यावर, आम्हाला Facebook वर “नमस्ते एव्हरीवन” नावाचे एक कम्युनिटी पेज सापडले, तेथे 10 जुलै 2010 रोजी व्हायरल पोस्टमध्ये दिसणाऱ्या लोखंडी खांबाचे चित्र शेअर केले होते. कॅप्शनमध्ये माहिती देताना असे लिहिले आहे की, छायाचित्रात दिसणारा हा लोखंडी स्तंभ राजस्थानच्या भरतपूर-लोहागड किल्ल्यात स्थापित आहे, जो जाट साम्राज्याचे महाराजा सूरजमल यांनी त्यांच्या कारकिर्दीत (1707 -1763) बांधला होता.

Fact Check: हा व्हायरल फोटो कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभाचा आहे का?
Courtesy: Facebook/Namasteeveryone

फेसबुक पोस्टवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे, जेव्हा आम्ही “लोह स्तंभ राजस्थान”, “भरतपूर लोह स्तंभ” सारख्या कीवर्डसह इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा आम्हाला छायाचित्रांचा संग्रह करणारी वेबसाईट फ्लिकरवर व्हायरल पोस्टमध्ये दिसणारा लोखंडी स्तंभाचा फोटो सापडला. डेव्हिड रॉस नावाच्या छायाचित्रकाराने 19 ऑक्टोबर 2009 रोजी आपल्या कॅमेऱ्याने हा फोटो काढला होता. त्याबद्दल माहिती देताना लिहिले आहे की, “हे चित्र भारतातील भरतपूर किल्ल्यातील लोखंडी स्तंभाचे आहे.”

आमचा तपास पुढे नेत, आम्ही कुतुबमिनार आणि भरतपूरच्या लोखंडी खांबांची तुलना केली आणि असे आढळले की दोन्ही एकमेकांपासून खूप भिन्न आहेत. भरतपूरच्या लोखंडी स्तंभावर काही नावे कोरलेली असली तरी कुतुबमिनार येथील स्तंभावर कोणत्याही प्रकारचे नाव दिसत नाही.

Fact Check: हा व्हायरल फोटो कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभाचा आहे का?
Courtesy: Delhitourism@Ironpillar/ screenshot@gopalgosawami

कुतुबमिनार कोणी बांधला?

कुतुबमिनार मुघलांनी बांधल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे, पण कुतुबमिनार आणि त्याच्या इतिहासाबाबत दिल्ली सरकारच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक ने इ.स. 1200 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. पण तो फक्त त्याचा साचा पूर्ण करू शकला. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी अल्तमशने त्याचे तीन मजले बांधले आणि 1368 मध्ये फिरोजशाह तुघलकाने पाचवा आणि शेवटचा मजला बांधला.”

कुतुबमिनारच्या बांधकामाशी संबंधित इतिहास समजून घेण्यासाठी आम्ही अलाहाबाद विद्यापीठातील मध्ययुगीन भारतीय इतिहासाचे प्राध्यापक श्री हेरंब चतुर्वेदी यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले की भारतात मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने १५२६ मध्ये केली होती, तर कुतुबमिनारचे शेवटचे बांधकाम फिरोजशाह तुघलकाने केले होते. हेरंब चतुर्वेदी म्हणाले की, कुतुबमिनार भारतात मुघलांच्या आगमनापूर्वी बांधण्यात आला होता.

Conclusion

आमच्या तपासात आम्हाला असे आढळून आले की कुतुबमिनार मुघलांनी बांधला नव्हता आणि जो लोखंडी स्तंभ दिल्लीचा कुतुबमिनार म्हणून व्हायरल होत आहे तो राजस्थानच्या भरतपूर किल्ल्यातील लोखंडी खांबाचा आहे.

Result: Missing Context

Our Sources

Image posted on flicker, Dated October 19, 2009

Delhi Government Tourism website

Conversation with former Allahabad University Professor of Medieval History Haremb Chaturvedi


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular