Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact Checkमुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र एडिटेड आहे

मुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र एडिटेड आहे

Claim

मुंबईतील एका कार्यक्रमात मुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र एडिटेड आहे
Courtesy:Twitter@/__Ramholkar/

Fact

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक टोपी परिधान केल्याचा उल्लेख असलेला कोणताही रिपोर्ट आम्हाला सापडला नाही. यानंतर, आम्ही व्हायरल चित्राचा रिव्हर्स इमेज सर्च घेतला. आम्हाला 10 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलेली पोस्ट आढळली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे की, मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रमाला ते उपस्थित होते. व्हायरल चित्रासारखाच एक फोटो या पोस्टमध्ये आहे. आम्ही व्हायरल चित्र आणि पीएम मोदींच्या अधिकृत फेसबुक पेजवरून मिळवलेल्या चित्राचे तुलनात्मक विश्लेषण केले. यावरून हे व्हायरल चित्र एडिट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्लामिक टोपी घातली

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी मुंबईत अल्जामी-तुस-सैफीयाह (सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपादित फोटो खोटा दावा करून व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Altered Media

Our Sources


Facebook Post of Narendra Modi on February 10, 2023

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular