Sunday, September 15, 2024
Sunday, September 15, 2024

HomeFact Checkवाराणसी फ्लायओव्हर कोसळल्याचा 2018 चा व्हिडिओ ठाण्यातील असल्याचा खोटा दावा व्हायरल

वाराणसी फ्लायओव्हर कोसळल्याचा 2018 चा व्हिडिओ ठाण्यातील असल्याचा खोटा दावा व्हायरल

एका मोठ्या पिलर खाली चिरडलेली अनेक वाहने दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युजर्स ही घटना 15 फेब्रुवारी रोजी ठाण्यात घडली असल्याचा दावा करत आहेत. आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवरही हा दावा प्राप्त झाला आहे.

Fact check

Newschecker ने प्रथम “Thane pillar collapse” साठी कीवर्ड शोध लावला, ज्यामध्ये कोणतेही विश्वसनीय वृत्त दिले नाही.

त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 25 फेब्रुवारी 2021 रोजीच्या न्यूजमिनिटच्या या बातमीकडे नेले, ज्यामध्ये हैदराबाद-बालानगर उड्डाणपूल कोसळल्याची खोटी बातमी पसरवल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आले असल्याची माहिती पाहायला मिळाली.

व्हायरल क्लिपच्या स्क्रिनशॉटची न्यूज रिपोर्टमध्ये दाखवलेल्या फोटोशी तुलना केल्यावर आम्हाला कळले की तोच व्हिडिओ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 2018 चा आहे जेव्हा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये फ्लायओव्हर कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर वाराणसी उड्डाणपूल कोसळल्याचा हा इंडियन एक्सप्रेसचा 15 मे 2018 रोजीचा रिपोर्ट आम्हाला सापडला. “वाराणसीच्या कॅन्टोन्मेंट भागात मंगळवारी एका बांधकामाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि तिघांना वाचवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अजूनही अनेक लोक त्याखाली दबले गेल्याची भीती आहे,” असे हा रिपोर्ट सांगतो. वाराणसीच्या कँट भागात एका उड्डाणपुलाचे दोन खांब कोसळून, काँक्रीटचा मोठा स्लॅब कोसळून, गाड्या चिरडल्या तसेच त्यात एक लोकल बसही होती. या घटनेत एका उड्डाणपुलाचे दोन खांब कोसळले अशी माहिती मिळाली. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ 2018 चा असल्याची पुष्टी करणारे तत्सम बातम्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

Conclusion

वाराणसीमध्ये 2018 मध्ये उड्डाणपूल कोसळल्याचा व्हिडिओ 15 फेब्रुवारी 2023 रोजी ठाण्यातील घटना असल्याचे सांगून दिशाभूल करीत शेयर करण्यात येत आहे.

Result: False

Sources

The Newsminute report, February 25, 2021

Indian Express report, May 25, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular