जम्मू-काश्मीरमधील बारामुला येथे वूलर तलावाजवळ कालवा खोदण्यात येत असताना सोन्याची नाणी सापडल्याचा दावा करणारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे.
यात म्हटले आहे की, शनिवारी, 13 फेब्रुवारी रोजी बारामुल्ला भागातील कामगारांना वूलर तलावाजवळ कालवा खोदताना सोन्या व चांदीची नाणी सापडली. सुमारे 30 कामगार या प्रकल्पासाठी काम करीत होते. आम्हाला हा दावा करणा-या ब-याच पोस्ट फेसबुकवर आढळून आल्या.
Fact Check / Verification
व्हायरल पोस्ट खरी आहे का याचा शोध घेण्यासाठी पडताळणी सुरु केली. बारामुल्ला जिल्ह्यात सोन्याची नाणी सापडल्याची बातमी आम्हाला कुठेही आढळून आली नाही. यांनंतर आम्ही व्हायरल होत असलेल्या नाण्यांचा फोटो Google Reverse Image द्वारे शोधला असता आम्हाला हा फोटो इटलीमधील असल्याचे व तो दोन वर्षांपूर्वी घेतला गेला असल्याची माहिती ABC News या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या लेखात आढळून आले.
फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कोमो येथे पुरातत्व खणनात चौथ्या किंवा पाचव्या शतकातील शेकडो सोन्याची नाणी सापडली आहेत. या संदर्भात आम्हाला इटालियन सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे एक ट्विट देखील आढळले.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लात कालवा खोदताना सोन्या चांदीची नाणी सापडलेली नाहीत तर दोन वर्षांपुर्वी इटलीत पुरातत्व खात्याच्या खोदकामात ही नाणी सापडलेली आहेत. त्याचा भारताशी कसलाही संबंध नाही.
Result- Misleading
Our Sources
Abc News– https://abcnews.go.com/International/hundreds-gold-coins-dating-romes-imperial-era-found/story?id=57720521
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या, माहितीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.