Sunday, September 25, 2022
Sunday, September 25, 2022

घरFact CheckPoliticsभाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते, हे विधान खरंच एकनाथ शिंदे यांनी...

भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते, हे विधान खरंच एकनाथ शिंदे यांनी केलंय? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एका फोटोद्वारे असा दावा केलाय की, हे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

“एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” या फेसबुक समूहात योगेश बारकुले पाटील यांनी व्हायरल फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत लिहिलंय की,”भाजपने माझा व माझ्या सहकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते.” फेसबुकवर हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे.

फोटो साभार : Facebook/groups/एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक
फोटो साभार : Facebook/Shrikant Shinde

Fact Check / Verification

एकनाथ शिंदे यांनी हे खरंच हे विधान केलंय की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो गुगल रिव्हर्स सर्च करून शोधला. पण आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही. मग ते विधान आम्ही गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला त्यासारखाच सरकारनामा यांचा दुसरा फोटो मिळाला. त्यानंतर आम्ही सरकारनामा यांचे अधिकृत फेसबुक पान तपासले. तेव्हा आम्हांला ३० जुलै २०२२ रोजीचा फोटो मिळाला.

फोटो साभार : Facebook/Sarkarnama

मुंबईत २९ जुलै २०२२ रोजी राजस्थानी समाजाचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी “गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही” असे विधान केले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर “राज्यपाल हे मोठं पद आहे. ते एक संविधानिक पद असून कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही” अशी प्रतिक्रिया दिली होती. याच विधानाचा सरकारनामा यांनी फोटो बनवला होता. यानंतर आम्ही व्हायरल फोटो आणि मूळ फोटोची तुलना केली. तेव्हा फोटोच्या मागचा रंग, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि नाव, या गोष्टी सारख्याच असल्याचे दिसले. तसेच मूळ आणि व्हायरल फोटोतल्या एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा फॉन्ट देखील वेगळा असल्याचे समजले.

फोटो साभार : Facebook/page/गाव तिथे राष्ट्रवादी, Facebook/Sarkarnama

त्याचबरोबर न्यूजचेकरने सरकारनामाच्या ऑफिसशी संपर्क साधला. तेव्हा तेथील सोशल मीडिया विभागाचे नेतृत्व करणाऱ्या समृद्धा भांबुरे यांनी सांगितले की,”व्हायरल फोटोत सरकारनामाचे टेम्प्लेट वापरले आहे. पण त्या फोटोतला फॉन्ट आणि आम्ही वापरत असलेला फॉन्ट वेगळा आहे.” 

या व्यतिरिक्त आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही, जर संपर्क झाला तर लेख अपडेट करू.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शेअर केल्या जाणाऱ्या व्हायरल फोटोतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान एडिट केले आहे. 

Result : Altered Photo/Video

Our Sources

३० जुलै २०२२ रोजीचा सरकारनामा यांचा मूळ फोटो

फोनवरून सरकारनामा येथील सोशल मीडिया विभागाचे नेतृत्व करणाऱ्या समृद्धा भांबुरे यांच्याशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular