Saturday, April 13, 2024
Saturday, April 13, 2024

HomeFact Checkनामिबियातून भारतात आलेल्या चित्त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला? येथे जाणून घ्या संपूर्ण...

नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला?

Claim

सोशल मीडिया वापरकर्ते एक व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यात नामिबियातील चित्ता असल्याचे सांगत आहेत.

व्हायरल दावा

Fact

17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना केंद्रीभूत ठेऊन अनेक वाद वाढत चालले आहेत. सोशल मीडियावर नामिबियाच्या चित्त्यांच्या नावाने अनेक दावे शेअर केले जात आहेत. Newschecker द्वारे या दाव्यांची तपासणी येथे वाचली जाऊ शकते. नामिबियातील चित्ता म्हणून शेअर केलेल्या या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी, आम्हाला त्याची एक की-फ्रेम Google वर सापडली. प्रक्रियेत, आम्हाला कळले की व्हायरल व्हिडिओ फेब्रुवारी 2021 पासून इंटरनेटवर उपस्थित आहे.

गुगल सर्च मध्ये मिळालेली माहिती

एशियानेट, TheNewsMinute, India.com, TV9 कन्नड आणि इंडिया अहेड न्यूजने फेब्रुवारी 2021 मध्ये व्हायरल दाव्याच्या संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील राजगोपाल नाईक, त्यांची पत्नी चंद्रमा मुलगा किरण यांच्यासोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होते. अर्सिकेरे तालुक्यात झुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्या मुलावर व पत्नीवर हल्ला केला. आपल्या कुटुंबाला वाचवण्याच्या प्रयत्नात राजगोपालची बिबट्याशी चकमक झाली आणि 20 मिनिटांच्या झुंजीनंतर त्यांनी अखेर बिबट्याला ठार केले.

Asianet Screenshot

या व्यतिरिक्त व्हायरल व्हिडीओ संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही  “ರಾಜಗೋಪಾಲ್ ಚಿರತೆ ಹಾಸನ ಕುಟುಂಬ” हा किवर्ड गुगलवर शोधला. या प्रक्रियेत, आम्हाला ETV कन्नड, TalukNews.com, Coastal Mirror, TV9 कन्नड, News18 Kannada आणि Asianet Kannada द्वारे कन्नड भाषेत प्रकाशित लेख प्राप्त झाले, ज्यामध्ये वरील रिपोर्ट प्रमाणेच हुबेहूब माहिती समाविष्ट केली गेली आहे.

अशा प्रकारे, आमच्या तपासणीत, हे स्पष्ट होते की नामिबियातील चित्ता म्हणून शेयर केलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल व्हिडिओ 2021 च्या फेब्रुवारी महिन्यातील आहे, जेव्हा कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील राजगोपाल नाईक यांनी आपल्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ठार केले होते.

Result :Partly False

Our Sources

Media reports from February 2021
Social media posts from February 2021

जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर, येथे क्लिक करा


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, संशोधनासाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular