Tuesday, November 28, 2023
Tuesday, November 28, 2023

घरFact CheckPoliticsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो नुकतेच...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो नुकतेच बदललेत? भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियावर दोन फोटो एकत्र करून ते शेअर केले जात आहे. त्यात असा दावा केलाय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सिंहासन डगमगल्यावर त्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला आहे. पण ते सुरक्षित असल्यावर फोटो लावले नव्हते.

फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली जात आहे. एका फेसबुक युजरने फोटो शेअर करत त्यात लिहिले आहे की,”दोन चित्रातील फरक ओळखा..?”

फोटो साभार : Facebook/Nachiket Pawanekar

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. टीव्ही ९ च्या बातमीनुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले आहे. 

त्यातच आता सोशल मीडियावर दोन फोटो एकत्र करून दावा केला जातोय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सिंहासन डगमगल्यावर त्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला आहे. पण सुरक्षित असल्यावर ते लावले नव्हते.

Fact Check/Verification

दोन्ही फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पानावर गेलो. त्यावेळी आम्हांला डाव्या बाजूचा फोटो १३ एप्रिल २०२१ रोजीचा असल्याचे समजले. 

फोटो साभार : Facebook/Uddhav Thackeray

त्यानंतर आम्हांला उजव्या बाजूचा फोटो २२ जून २०२२ रोजीचा असल्याचे समजले. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सिंहासन डगमगल्यावर लावला आहे, असा दावा केलाय. म्हणजेच त्यांनी नुकताच हा फोटो लावल्याचे म्हटले जात आहे. यासाठी आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंचे अधिकृत फेसबुक पान तपासले. 

फोटो साभार : Facebook/Uddhav Thackeray

छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आम्हांला २५ जानेवारी २०२२ रोजीपासून असल्याचे दिसले. त्यानंतर आम्हाला १७ फेब्रुवारी २०२२, ८ मार्च २०२२, ४ एप्रिल २०२२ रोजी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसत आहे.

फोटो साभार : Facebook/Uddhav Thackeray

त्याचबरोबर आम्हाला ६ मे २०२२ रोजी देखील छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याचे समजले.

फोटो साभार : Facebook/Uddhav Thackeray

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सध्या बदलले नसून ते जानेवारी २०२२ पासून उपलब्ध आहे.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो उपलब्ध आहे. उद्धव ठाकरे यांनी ते दरम्यानच्या काळात बदललेले नाही.

Result: False

Our Sources

२५ जानेवारी २०२२, १७ फेब्रुवारी २०२२, ८ मार्च २०२२, ४ एप्रिल २०२२ आणि ६ मे २०२२ रोजीची उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पानावरील पोस्ट

स्वतः केलेले विश्लेषण


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular