Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact Checkअंबानी कुटुंबाने शाहरुख खानसोबत 'पठाण' पाहिला? सात वर्षे जुना आहे हा फोटो

अंबानी कुटुंबाने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ पाहिला? सात वर्षे जुना आहे हा फोटो

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेला शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला. काही चित्रपटगृहांबाहेर चित्रपटाच्या विरोधात निदर्शने झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मुकेश अंबानीच्या कुटुंबासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. अंबानी कुटुंबाने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपट पाहिल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे.

अंबानी कुटुंबाने शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला.
Courtesy: Facebook/Yashvi Oswal
अंबानी कुटुंबाने शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला.
Courtesy: Twitter@Khurraminc

फोटोसोबत लोक कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “तुम्ही लोक बहिष्कार टाकत रहा, थिएटरच्या बाहेर अंबानी कुटुंब शाहरुखसोबत पठाण पाहत आहे”. असा दावा करत अनेकांनी हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.

Fact Check/Verification

गुगलवर व्हायरल चित्राचा रिव्हर्स इमेज शोध करताना, आम्हाला फायनान्शिअल एक्सप्रेसची एक बातमी सापडली. 28 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीत व्हायरल झालेले चित्र पाहता येईल. ही बातमी Reliance Jio 4G च्या लॉन्चिंग कार्यक्रमाशी संबंधित आहे, ज्यामध्ये शाहरुख खान देखील आला होता. त्यावेळी या सेल्फीचा आणखी एक फोटो आला होता, ज्यामध्ये संगीतकार ए आर रहमान देखील दिसत आहेत. काही पत्रकारांनी 28 डिसेंबर 2015 रोजी व्हायरल झालेला फोटोही शेअर केला होता. व्हायरल झालेला फोटो या कार्यक्रमाचा आहे. शाहरुख खानचे इतर फोटो देखील बातम्यांमध्ये पाहिले जाऊ शकतात. शाहरुख खान Jio 4G चा ब्रँड अम्बेसेडर होता.

अंबानी कुटुंबाने शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला.
Courtesy: Financial Express

त्यावेळी या सेल्फीचा आणखी एक फोटो आला होता, ज्यामध्ये संगीतकार ए आर रहमान देखील दिसत आहेत. काही पत्रकारांनी 28 डिसेंबर 2015 रोजी व्हायरल झालेला फोटोही शेअर केला होता.

Conclusion

एकूणच, शाहरुख खान अंबानी कुटुंबासोबत सेल्फी घेताना दाखवणारे हे चित्र सात वर्षांहून अधिक जुने असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पठाण चित्रपटाशी त्याचा काहीही संबंध नाही.

Result: False

Our Sources
Report of Financial Express

Tweet of Hindustan Times


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular