Monday, October 14, 2024
Monday, October 14, 2024

HomeFact Checkरतन टाटांच्या नावाने व्हायरल झाला भ्रामक संदेश, जाणून घ्या सत्य

रतन टाटांच्या नावाने व्हायरल झाला भ्रामक संदेश, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- रतन टाटा यांनी 2020 हे जिंवत रहायचे वर्ष आहे असा संदेश उद्योगधंद्याच्या काळजीत बुडालेल्यांना दिला आहे. 

सोशल मीडियामध्ये उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने उद्योगधंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी एक संदेश व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, उद्योग धंद्यातील माझ्या प्रिय मित्रानो,2020 हे साल फक्त जिवंत रहायचे वर्ष आहे,नफा-नुकसान विषयी अजिबात विचार करू नका,स्व़प्न आणि योजना विषयी चकार शब्दही काढू नका,या वर्षी स्वतःला जिवंत ठेवणे हेच सर्वात महत्वाचे आहे, जिवंत राहणे हेच नफा मिळवल्यासारखे आहे.

Verification- या संदर्भात आम्ही पडताळणी सुरु केली, काही किवर्डसच्या आधारे आम्ही याबाबत गूगलमध्ये शोध घेतला मात्र आम्हाला प्रतिष्ठित माध्यमांमध्ये, न्यूज वेबसाईटवर रतन टाटा यांच्या संदेशाबद्दलची न्यूज आढळून आली नाही. मात्र फेसबुक वर काही कीवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता. रतन टाटांच्या नावाने हां संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. याबाबत अनेक पोस्ट आढळून आल्या.

https://www.facebook.com/deepak.londhe.3517/posts/1368491713346606

अर्काईव्ह

ही पोस्ट मराठी शिवाय हिंदी भाषेत ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पडताळणी दरम्यान समोर आले. 

रतन टाटांनी उद्योग धंद्याच्या काळजीत असणा-या व्यावसायिकांसाठी खरंच असा काही संदेश दिला आहे का याची शहानिशा करण्यासाठी आम्ही त्यांचे ट्विटर हॅंडल चेक केले असता आम्हाला 3 मे रोजी त्यांनी केेलेले एक ट्विट मिळाले. यात त्यांनी म्हटले आहे की, हा संदेश मी दिलेला नाही. बातम्यांच्या स्त्रोतांची पडताळणी करा, माझ्या फोटोसोबत असणारा संदेश माझा असेलच असे नाही. ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. 

यावरुन हेच स्पष्ट होते की रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश हा खोटा आहे, रतन टाटा यांनी याबात ट्विटर वर स्पष्टिकरण दिले असून फेक न्यूज पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 
Source 
Facebook, Twitter, Google Search 
Result- Fabricated News/False content

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Attachments area

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular