Thursday, July 18, 2024
Thursday, July 18, 2024

HomeFact Checkराम मंदिर भूमीपूजन समारंभ मंडपाच्या सजावटीचा नाही हा व्हिडिओ, हे आहे सत्य

राम मंदिर भूमीपूजन समारंभ मंडपाच्या सजावटीचा नाही हा व्हिडिओ, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन मंडपाच्या सजावटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, 5 आॅगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. यासाठी खास सजावट असलेला मंडप उभारणीचे काम सुरु आहे. त्याचाच हा व्हिडिओ आहे. डोळ्यांचे पारणे फिटणारी ही सजावट.. खरंच धन्य आहेत भारतीय.. कारण मोदी है तो मुमकीन है. असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/watch/?v=301692444580039

संग्रहित

Fact Check / Verification

आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा खरंच राम मंदिराच्या भूमीपूजन मंडपाच्या सजावटीचा आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता 6 जानेवारी 2020 रोजीचे इटीवी तेलगूच्या बातमीचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. या व्हिडिओतील सजावट ही व्हायरल व्हिडिओतील सजावटीशी मिळतीजुळती असल्याचे दिसून आले. यात म्हटले आहे की हैदराबाद येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात वैकुठ एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती.

यानंतर आणखी एका यूटयूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओतील दृश्याशी मिळतीजुळती दृश्ये दिसून आली. वैकुठ एकादशीनिमित्त श्री रंगनाथस्वामी मंदिरात स्वामी मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे

पुढे शोध सुरुच ठेवला असता Telangana Tourist Badri  या युटूयूब चॅनलवर 6 जानेवारी 2020 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओत देखील हैदराबादमधील जियागुडा येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराची उत्तरद्वार दर्शनाचे दृश्य असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय आम्ही व्हायरल व्हिडिओ आणि हैद्राबादमधील श्री रंगनाथस्वामी मंदिरातील दृश्यांची तुलना करुन पाहिली असता व्हायरल व्हिडिओ रंगनाथ स्वामी मंदिरातीलच असल्याचे स्पष्ट झाले.

Ram temple fake video

Conclusion

पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ हा राम मंदिराच्या भूमीपूजन मंडपाच्या सजावटीचा नसून 6 महिन्यापूवी हैद्राबादमध्ये एकादशी निमित्त श्रीरंगनाथस्वामी मंदिरात केलेल्या सजावटीचा आहे. हाच व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Sources

Youtube- https://www.youtube.com/watch?v=0FhiRcAQIPA

Etv- https://www.youtube.com/watch?v=jM2ustyPhDg

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular