Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
युक्रेनमध्ये शीख समुदायाच्या पुढाकाराने गुरु का लंगर आयोजित करण्यात आल्याचा दावा करत एक फोटो मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Fact
शीख सेवा सोसायटी युक्रेनमध्ये लंगर सुरु करण्यात आल्याच्या दाव्याने व्हायरल होत असेला फोटो चुकीचा आहे मात्र या चुकीच्या माहितीचे शिकार अभिनेत्री ऋचा चढ्ढा, ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम आणि माजी खासदार उदित राज हे देखील झाले आहेत. Google Reverse Image वर व्हायरल इमेज शोधल्यानंतर, न्यूजचेकरला Being Sikh फेसबुक पेजवर 20 नोव्हेंबर 2016 रोजी अपलोड केलेली इमेज सापडली. व्हायरल झालेला फोटो आणि Being Sikh ने अपलोड केलेला फोटो दोन्ही सारखेच आहेत. म्हणजेच व्हायरल होणारा फोटो 2016 पासून इंटरनेटवर आहे.
आम्हाला फेसबुकवर 20 नोव्हेंबर 2016 रोजी ਸੌਖੀ ਨਹੀਉ ਟੱਕਰ ਲੈਣੀ “Kalgidhar” नावाच्या फेसबुक पेजद्वारे अपलोड केलेला फोटो प्राप्त झाला. कॅप्शननुसार, कॅनडातील टोरंटो येथील ब्रॅम्प्टन येथे शीख सेवा संस्थेने आयोजित सांता परेडमध्ये लंगरचे आयोजन केले होते.
आम्ही व्हायरल फोटो शीख सर्व्हिस सोसायटी ऑफ ब्रॅम्प्टनने पोस्ट केलेल्या फोटोशी जुळवून पाहिला आणि दोन्हींत साम्य आढळले

Newschecker शी झालेल्या संभाषणात टोरंटोच्या शीख सेवा सोसायटीने सांगितले की व्हायरल होत असलेला फोटो 2016 मध्ये सांताक्लॉज परेडदरम्यानचा होता. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की त्यांची संस्था ओंटारियोच्या बाहेर कार्यरत नाही.
शीख सेवा सोसायटीने स्पष्ट केले की व्हायरल होत असलेले चित्र यूके किंवा युक्रेनचे नाही, हे छायाचित्र कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील चर्च स्ट्रीट वेस्टचे आहे.

Result: False Context/ False
टीप: हा लेख 27 फेब्रुवारी रोजी नवीन माहितीसह अद्यतनित केला गेला आहे.
तुम्हाला ही वस्तुस्थिती पडताळणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य पडताळण्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Sources
Facebook post of Being Sikh on 20/11/2016
Fcebook post Of ਸੌਖੀ ਨਹੀਉ ਟੱਕਰ ਲੈਣੀ “Kalgidhar” ਦੇ ਸ਼ੇਰਾ ਨਾਲ,
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
March 1, 2022
Yash Kshirsagar
March 2, 2022
Yash Kshirsagar
March 4, 2022