Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सर्वोच्च न्यायालयाचे ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य बदलेले असून त्या जागी ‘यतो धर्मस्ततो जयः’ असे नवे ब्रीदवाक्य लिहिण्यात आल्याच्या दाव्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदलण्यात आले का याबाबत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. फेसबुक आणि ट्विटरवर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.


सोशल मीडयात या दाव्याच्या पोस्ट आढळून आल्या असल्या तरी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आम्हाला सर्वोच्च न्यायालायचे ब्रीदवाक्य बदलल्याची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल दाव्याची पडताळणी पुढे सुरुच ठेवली. यासाठी आम्ही सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटला भेट दिली. यात advocatemunday मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य ‘यतो धर्मस्ततो जयः‘ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकिल पायल गायकवाड यांनी देखील ब्रीदवाक्य बदलेले नसल्याचे व खोटा दावा व्हायरल झाल्याचे म्हटले आहे.

याशिवाय पीआयबीने देखील ट्विट करुन याबाबत स्पष्टिकरण दिले आहे. यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदलण्यात आलेले नाही. पहिल्यापासूनच यतो धर्मस्ततो जयः हेच ब्रीदवाक्य आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य पहिल्यापासूनच यतो धर्मस्ततो जयः हे आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1296808659914076160
SUPREME COURT OF INDIA– https://main.sci.gov.in/history
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.