Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkव्हायरल फोटो अयोध्येतील शिवलिंगाचा नाही, जाणून घ्या सत्य

व्हायरल फोटो अयोध्येतील शिवलिंगाचा नाही, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा-  हा फोटो अयोध्येत राममंदिराचा बांधकाम करण्यासाठी सपाटीकरणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाचा आहे. 

 खोदकाम करताना सापडलेल्या शिवलिंगाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हे शिवलिंग अयोध्येत राम मंदिरासाठी सपाटीकरण करताना सापडले असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

https://www.facebook.com/trivikram.jadhav/posts/10220048787083192

अर्काइव्ह

पडताळणी-  अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी सपाटीकरण करताना खरंच शिवलिंग सापडले आहे का याबाबत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्डच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या. 

याशिवाय आम्हाला एबीपी माझाच्या बातमीचा व्हिडिओ मिळाला. यात रामंदिराच्या बांधकामासाठी सपाटीकरण करत असताना काही अवशेष सापडल्याचे म्हटले आहे. बातमीत विश्व हिंदू परिषदचे नेते शरद शर्मा यांनी साडेचार फुट उंचीचे शिवलिंग मिळाल्याची माहिती दिली आहे.बातमीत अवशेषांचे आणि शिवलिंगाचे फोटो देखील दाखवण्यात आले. 

 अर्काइव्ह

व्हायरल शिवलिंगाचा फोटो यापैकी एकाही बातमीतील फोटोशी जुळत नसल्याचे दिसून आले. . त्यामुळे आम्ही व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर चार वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला.बातमीनुसार फर्रुखाबाद येथील मठिया देवी मंदिरात खोदकाम करत असताना अडीचशे वर्ष जुन्या शिवलिंगाचा  भाग आतून बाहेर आला.

यावरुन हेच सिद्ध होते की, शिवलिंगाचा व्हायरल फोटो हा अयोध्येतील नसून फर्रुखाबाद येथे चार वर्षापूर्वी सापडलेल्या शिवलिंगाचा आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा फोटो व्हायरल होत आहे. 

Source
Facebook, Google Reverse Image
Result- Misleading

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular