Authors
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे शुक्रवारी निधन झाले. यादरम्यान मोदी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक छायाचित्रे आहेत. हे फोटो पीएम मोदींच्या आईचे म्हणून शेअर केले जात आहेत.
Fact Check/ Verification
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओमध्ये एकामागून एक दिसणाऱ्या चित्रांबद्दल तपास केला.
पहिला फोटो:
दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही चित्राचा रिव्हर्स इमेज शोध घेतला आणि आढळले की चित्र आधीच व्हायरल झाले आहे. न्यूजचेकरने 2019 मध्ये या चित्राची तपासणी केली होती. आमच्या तपासणीत, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. हा फोटो कोणाचा आहे याची आम्ही स्वतंत्रपणे पडताळणी करू शकलो नाही, मात्र तो पंतप्रधानांच्या आई हीराबेन मोदींचा नाही हे निश्चित आहे.
दुसरा फोटो :
दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही रिव्हर्स इमेज शोध घेतला. आम्हाला 2019 मध्ये Aaj Tak ने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्ट मध्ये व्हायरल झालेल्या चित्रासारखेच चित्र आढळून आले. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे छायाचित्र नरेंद्र मोदींच्या एकुलत्या एक बहिण वासंतीबेन हसमुखलाल मोदी यांचे आहे.
पुढे, आम्हाला नवभारत टाईम्ससह इतर प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या बातम्या देखील आढळल्या ज्यात असे म्हटले आहे की फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहिण वासंतीबेन यांचा आहे.
2014 मध्ये एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्येही आम्हाला वासंतीबेन यांचे छायाचित्र सापडले.
तिसरा फोटो:
चित्राची सत्यता जाणून घेण्यासाठी, आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. NDTV ने सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये आम्हाला हे चित्र आढळले. या पत्रकार भावना सौम्या असल्याचे वृत्तात सांगण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आईला गुजरातीत लिहिलेल्या पत्रांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.
Conclusion
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की अनेक वेगवेगळ्या महिलांची छायाचित्रे एकत्र करून तयार केलेला व्हिडिओ दिशाभूल करीत शेअर केला जात आहे.
Result: Missing Context
Our Sources
Report Published by AAJ Tak published in 2019
Report Published by Navbharat Times published in 2019
Report Published by NDTV published in 2020
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in