Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckViralहरियाणात झालेल्या त्या हाणामारीच्या दाव्याला कुठलाही धार्मिक दृष्टिकोन नाही, चुकीचा दावा व्हायरल

हरियाणात झालेल्या त्या हाणामारीच्या दाव्याला कुठलाही धार्मिक दृष्टिकोन नाही, चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हरियाणात एक मुस्लिम वेटर असभ्यतेने वागला, त्यामुळे मुस्लिमांनी हिंदू महिलेच्या कुटुंबियांना मारहाण केली. व्हायरल व्हिडिओतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे, ज्यात काही लोकं एकमेकांना मारहाण करत आहे. 

एक फेसबुक युजरने व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिले,”व्हिडिओ हरियाणात आहे. मुस्लिम ढाब्यात हिंदू महिलेला पाहून मुस्लिम वेटरने महिलेवर अश्लील टिप्पणी केली. त्या महिलेने विरोध केल्यावर तिच्या नवऱ्याला मुस्लिम कर्मचाऱ्यांनी मिळून मारले. कुठल्याही मुस्लिम ढाब्यात कुटुंबियासोबत जातांना सावध राहा. धन्यवाद…!”


(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

हरियाणात
फेसबुकचा स्क्रीनशॉट – सनातन हिंदू

एक दुसऱ्या फेसबुक युजरने व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिले,”फेसबुकने हा व्हिडिओ डिलीट केला आहे. याला खूप व्हायरल करून हिंदू कुटुंबियांना जागृत करण्याचे काम करा. ही व्हिडिओ हहरियाणात आहे. मुस्लिम ढाब्यात हिंदू महिलेला पाहून तिथल्या मुस्लिम वेटरने अश्लील टिप्पणी केली. महिलेने त्याचा विरोध केल्यावर तिच्या नवऱ्याला तिथल्या कर्मचाऱ्यांनी मिळून खूप मारले. मुस्लिमांचा ढाबा, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकान, इत्यादी ठिकाणी अजून जा, आपल्या महिलांचा अपमान करून घ्यायला..!”

(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

फेसबुकचा स्क्रीनशॉट – शुभम हिन्दू
ट्विटरचा स्क्रीनशॉट – विष्णु तिवारी

(ट्विटची संग्रहित लिंक)

Fact Check / Verification


हरियाणात मुस्लिम वेटर असभ्यतेने वागला, त्याचा विरोध केल्यावर मुस्लिमांनी हिंदू महिलेच्या कुटुंबियांना मारहाण केली. या व्हायरल दाव्याची सत्य माहिती तपासण्यासाठी आम्ही व्हिडिओ नीट पाहिला. व्हिडिओच्या वरती उजव्या बाजूला ‘जनता Breaking News’ चा लोगो आहे. आम्ही ‘Janta Breaking News’ हा कीवर्ड टाकून फेसबुकवर शोधले. तेव्हा आम्हांला ‘Janta Breaking News’ या फेसबुक पानावर २० जानेवारी २०२० रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. त्या व्हिडिओसोबत लिहिले होते की,”मन्नत स्टार ढाबा पर ग्राहकों से मारपीट, महिला के साथ वेटर ने की थी छेड़छाड़ फिर शुरू हुआ विवाद, देखें कैमरे में कैद तस्वीरें।” हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास ८ मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये ढाब्यात असणाऱ्या लोकांमध्ये हाणामारी झाली. पण यात कुठेही धार्मिक दृष्टिकोन दिसून येत नाही. 

फेसबुकचा स्क्रीनशॉट – Janta Breaking News

हे करत असतांना आम्ही ‘हरियाणात मन्नत ढाबा मारहाण’ असा कीवर्ड गुगलवर टाकला. तेव्हा आम्हांला ETV Haryana ने १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेली एक बातमी मिळाली. त्यानुसार हरियाणातील कुरुक्षेत्रात असणाऱ्या ‘मन्नत स्टार’ ढाब्यात १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री दोन्ही बाजूने खूप हाणामारी झाली. ढाब्यात जेवायला येणाऱ्या कुटुंबासोबतच तिथल्या कर्मचाऱ्यांनीही मारहाण केली. जेव्हा ढाब्यात जेवायला आलेल्या एक महिलेसोबत कर्मचारी उद्घटपणे वागला, तेव्हा या घटनेची सुरवात झाली. त्या कुटुंबाने याची तक्रार ढाब्याच्या रेसिप्शनवर बसलेल्या एका युवकाजवळ केली, तेव्हा त्यानेही उद्घटपणे उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूने हाणामारी झाली. यात तीन लोक जखमी झाले.

ETV हरियाणाची बातमी

Newschecker ने निलोखेरीच्या बुटाना पोलिस स्थानकाचे एसएचओ (पोलीस निरीक्षक) कंवर सिंह यांना संपर्क साधला. त्यांनी सांगितले की,”हरियाणात झालेल्या या घटनेत धार्मिक दृष्टिकोनाचा कुठलाही संबंध नाही. यातील दोन्ही बाजूचे लोकं हिंदू धर्माचेच आहे. याबाबत दोन्ही बाजूने एफआयआर दाखल करण्यात केली आहे आणि पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.”

Conclusion


याप्रकारे आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, हरियाणात एक मुस्लिम वेटर असभ्यतेने वागला, त्यामुळे मुस्लिमांनी हिंदू महिलेच्या कुटुंबियांना मारहाण केली. त्या व्हिडिओत केलेल्या दाव्यात कुठल्याही धार्मिक दृष्टिकोनाचा संबंध नाही. दोन्ही बाजूचे लोकं एकाच धर्माची आहेत. 


Result : Misleading/Partly False

Our Sources 

Janta Breaking News

ETV Haryana

बुटाना पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कंवर सिंह यांचे विधान

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular