Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Viral
कर्नाटकमधील हुबळीत दहशतवादी सापडलेला असल्याच्या दाव्याने 15 सेंकंदांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात एका बसजवळ एक व्यक्ती खाली बसला असून पोलिसांनी त्याला गराडा घातला आहे.
कर्नाटकातील हुबळीमध्ये खरंच दहशतवाद्याला पोलिसांनी पकडले आहे का याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डसच्या साहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला हुबळी टाईम्सची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, हा व्हिडिओ पोलिसांनी केलेल्या माॅकड्रिलचा आहे. बातमीनुसार हे माॅकड्रिल 22 आॅगस्ट रोजी करण्यात आले. व्हिडिओत उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य रस्ते वाहतुक मंडळाच्या बस मध्ये लोकांची गर्दी असल्याचे दिसते. यामुळे आसपासचे लोक घाबरलेले असल्याचे दिसून येते. या माॅक ड्रिलमधून हुबळी धारवाड पोलिस आणि सामान्स कार्तयकर्तत्यांनी केले होते. यातून आपत्कालिन परिस्थिती काय काळजी घ्यावी याबाबत संदेश देण्यात आला.
हुबळी टाईम्सच्या यूट्यूब चॅनलवर देखील माॅकड्रिलचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
ओल्ड हुबेर पुलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर एस. एश कमातगी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या भागात दहशतवादी पकडलेला नाही. व्हायरल व्हिडिओ नुकताच झालेल्या माॅकड्रिलचा आहे. हुबळी-धारवाड पोलिसांनी ही माॅक ड्रिल केली होती यातून संकटाच्या लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही हुबळी पोलिस त्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास उपलब्ध आहेत, हा संदेश यातून द्यायचा होता.
यावरुन हेच स्पष्ट होते की, कर्नाटकमधील हुबळी शहरात दहशतवादी सापडलेला नाही, व्हायरल व्हिडिओ पोलिसांनी केलेल्या माॅकड्रिलचा असून तो चुकीच्या दाव्याने सोशल मिडियात शेअर केला जात आहे.
Hubali times- https://hubballitimes.com/terrorist-caught-in-hubballi-viral-video-of-mock-drill-stumps-citizens/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Prasad S Prabhu
May 24, 2025
Prasad S Prabhu
May 19, 2025
Raushan Thakur
January 29, 2025