Friday, July 19, 2024
Friday, July 19, 2024

HomeFact CheckViralतुर्कीतील भूकंपाचे नाहीत व्हायरल फोटो, जाणून घ्या सत्य

तुर्कीतील भूकंपाचे नाहीत व्हायरल फोटो, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

तुर्कीमधील इजमिर शहरात शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. या भूकंपात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 800जण जखमी झाले आहेत. शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो शेअर होत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे.  पोस्टमध्ये ढीगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीजवळ बसलेल्या कुत्र्याचा फोटो शेयर करून म्हटले की, तुर्कस्थानमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर प्राण्यांचा माणसाप्रती असलेला जिव्हाळा दर्शविणारा फोटो”

फेसबुक /संग्रहित

ट्विटरवर देखील हे फोटो तुर्कीमधील भुंकपाचे असल्याचा दावा केला जात आहे.

संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल फोटो तुर्कीमधील भुंकपाचे आहेत काय याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता या फोटोंचे अनेक परिणाम दिसून आले.

शोधा दरम्यान आढळून आले की, व्हायरल फोटो हे 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जारोस्लाव नोस्का नावाच्या फोटोग्राफर हे फोटो काढले आहेत. अ‍ॅलेमी या स्टॉक फोटो वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, तुर्कीतील भुकंपाच्या नावाने जुनेच फोटो व्हायरल झाले आहेत. दोन वर्षापूर्वी जारोस्लाव नोस्का नावाच्या फोटोग्राफर हे फोटो काढले आहेत त्याचा तुर्की भुंकपाशी संबंध नाही.

Result: Misleading

Our Source

alamy.com- https://www.alamy.com/dog-looking-for-injured-people-in-ruins-after-earthquake-image230074182.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular