Authors
याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.
सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एका जलाशयातून पाण्याचे फवारे उडतांना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की, जलाशयातून पाण्याचा फवारा काही मीटर उंच आकाशाला भिडताना दिसत आहे. त्यात असा दावा केला जातोय की, हा व्हिडिओ इलाहाबाद (प्रयागराज) मधील आहे. आकाश गंगा नदीतून पाणी ओढताना दिसत आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
या दाव्यासोबत हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला जात आहे. लोकांचे असे म्हणणे की, हे निसर्गाचे अद्भूत दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही इन व्हीड टूलच्या मदतीने यांडेक्सवर रिव्हर्स सर्च करून शोधले. तेव्हा आम्हांला मुंबई मिररची एक बातमी मिळाली. १० जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीतला व्हिडिओ महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यातील असल्याचे सांगितले आहे. पुरंदर तालुका हा पुणे जिल्ह्यात येतो.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
बातमीनुसार, हा व्हिडिओ पुरंदरजवळील नझरे धरणातील आहे. ८ जून २०१८ मध्ये पाण्याच्या स्थिती चक्रीवादळासारखी झाली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सेंटर फॉर सिटीझन सायन्सचे अधिकारी चौकशीसाठी घटनास्थळी पोहोचले होते.
तेथील स्थानिक लोकांकडून फोटो आणि इतर माहिती गोळा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे चक्रीवादळ सुमारे ९० ते १२० सेकंदाचे होते. या व्यतिरिक्त ह्या व्हिडिओ संदर्भात हिंदुस्थान टाइम्सने देखील बातमी प्रकाशित केली होती. या बातमीत सेंटर फॉर सिटीझन सायन्सने सांगितले की, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा चक्रीवादळाची अधिकृतपणे नोंद केली गेली आहे. आजतकने देखील याची बातमी केली होती.
या व्हिडिओसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही फेसबुकवर शोधले. तेव्हा आम्हांला याचा संपूर्ण व्हिडिओ मिळाला. १.२५ मिनिटांच्या या व्हिडिओत काही लोक मराठीत बोलतांना दिसत आहे. हा व्हिडिओ ९ जून २०१८ रोजी फ्रेश मराठी नावाच्या फेसबुक पानावर अपलोड केला होता.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ प्रयागराजचा नसून तो चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका धरणातील पाण्याच्या चक्रीवादळाचा हा व्हिडिओ आहे.
Result : Partly False
Our Sources
१० जून २०१८ रोजी मुंबई मिरर आणि आजतकची प्रकाशित झालेली बातमी
११ जून २०१८ रोजी प्रकाशित झालेली हिंदुस्तान टाइम्सची बातमी
९ जून २०१८ रोजी फ्रेश मराठी या फेसबुक पानावर अपलोड केलेला व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.