Saturday, September 21, 2024
Saturday, September 21, 2024

HomeFact CheckScience and Technologyव्हाट्स ॲपवर तीन बरोबरच्या लाल खुणेचा अर्थ म्हणजे सरकार तुमचे फोन रेकॉर्ड...

व्हाट्स ॲपवर तीन बरोबरच्या लाल खुणेचा अर्थ म्हणजे सरकार तुमचे फोन रेकॉर्ड करतंय? फेक दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला जातोय की, व्हाट्स ॲपवर तीन बरोबरच्या लाल खुणेचा अर्थ म्हणजे सरकार तुमचे फोन रेकॉर्ड करतंय.

फेसबुकवर हा मेसेज शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Facebook/groups/राजकारणाचा फड
फोटो साभार : Facebook/Mahebub Shaikh

न्यूजचेकरच्या (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर हा दावा एका युजरने तथ्य पडताळणीसाठी पाठवला आहे. याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले आहे, तुम्ही ते इथे वाचू शकता.

व्हाट्स ॲप नंबरवर पाठवलेला दावा

Fact Check / Verification

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर ‘व्हाट्स ॲप मेसेज रेड टिक गव्हर्नमेंट’ असं टाकून शोधले. तेव्हा आम्हांला २८ मे २०२१ मधील इंडियन एक्सप्रेसची बातमी मिळाली. या बातमीनुसार, तीन बरोबरच्या लाल खुणेचा मेसेज २०२० मध्ये देखील व्हायरल झाला होता. पण हा मेसेज फेक आहे. व्हाट्स ॲपने कोणतेही नवीन कम्युनिकेशनचे नियम लागू केलेले नाही, तसेच तीन लाल आणि निळ्या खुणा असे कोणतेही वैशिष्ट्य नाही.

फोटो साभार : Indian Express

त्यानंतर आम्ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या संकेतस्थळावर या संदर्भात शोधले. पण आम्हांला तिथे असा कोणताही आदेश काढल्याची सूचना मिळाली नाही. याच दरम्यान आम्हांला ७ मार्च २०२० मधील पीआयबीचे एक ट्विट मिळाले. त्या ट्विटनुसार, हा मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हाट्स ॲपवर तीन बरोबरच्या लाल खुणेचा अर्थ म्हणजे सरकार तुमचे फोन रेकॉर्ड करण्याचा दावा केलेला मेसेज फेक आहे. हा फेक मेसेज २०२० पासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular