Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap : प्रसिद्ध 'कच्चा बदाम' फेम भुवन बदायकरला रेल्वेत नोकरी मिळाल्यापासून...

Weekly Wrap : प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’ फेम भुवन बदायकरला रेल्वेत नोकरी मिळाल्यापासून ते युपीत लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यापर्यंतचे दावे, आठवड्यातील या आहेत टॉप फेक बातम्या

‘कच्चा बदाम’ फेम भुवन बादायकर याच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू झाला, अशा बातम्या अनेक वृत्त वाहिन्यांनी दाखवल्या. पण हा देखील दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. या आठवड्यात न्यूजचेकरने काही दाव्यांची पडताळणी केली आहे. त्याचा तपशीलवार अहवाल तुम्ही इथे वाचू शकता.

प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरला रेल्वेने खरंच नोकरी दिली ? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर होत असून त्यात दावा केलाय की, प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’ फेम भुवन बादायकरला रेल्वेने नोकरी दिली. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

सोशल मीडियावर चालत्या रेल्वेवर दगडफेक करण्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत व्हायरल 

मुस्लिम तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

औरंगाबादमध्ये खरंच कलम १४४ लागू करण्यात आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे 

औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू झालंय, अशा बातम्या अनेक वृत्त वाहिन्यांनी दिल्या. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश जारी केले आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळालेली नाही, आठवड्यापूर्वीचा फोटो व्हायरल 

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. त्यात दावा केलाय की, औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळाली. पण आमच्या पडताळणीत हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

युपीत लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यानंतर तेथील रस्त्यावर खरंच अजान देण्यात आली होती ? जाणून घ्या सत्य काय आहे 

उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण तो व्हिडिओ आमच्या पडताळणीत दोन वर्षांपूर्वीचा आढळला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular