Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

HomeFact CheckFact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे

Fact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे

Claim
आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ व्हीआयपी बॅगच्या जाहिरातीसाठी बनविण्यात आला आहे.

Fact
हा दावा खोटा आहे. व्हीआयपी बॅग कंपनीने याचा इन्कार केला आहे.

व्हीआयपी बॅग कंपनीच्या जाहिरातीचा व्हिडीओ असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कंपनीने लव्ह जिहादशी संबंधित व्हिडीओ बनवून आपली जाहिरात केली आहे. या कंपनीवर कारवाई करावी असा दावा केला जात आहे.

Fact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे
Courtesy: Twitter@WRaju27452636

ट्विटर च्या बरोबरीनेच व्हाट्सअपवर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ असे कॅप्शन त्याला आहे आणि शेवटी व्हीआयपी बॅगचा व्हिज्युअल दिसतो. यामुळे या व्हिडिओला अनेकजण आक्षेपार्ह असल्याचा आरोप करीत आहेत.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे

Fact check/ Verification

न्यूजचेकर ने यासंदर्भात तपास करताना सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स काढून रिव्हर्स इमेज सर्च घेतला.

या सर्च ने आम्हाला सुमी रसिक या मल्याळम टीव्ही मालिका अभिनेत्री आणि मॉडेलने @sumirashik_official_ या तिच्या Instagram खात्यावर अपलोड केलेल्या मूळ व्हिडिओकडे नेले. रील अभिनेता विष्णू के विजयन यांनाही टॅग केले आहे. मूळ व्हिडिओमध्ये व्हीआयपी किंवा कोणत्याही सुटकेसचा संदर्भ नव्हता.

Courtesy: Instagram@sumirashik_official_

20 एप्रिल 2023 रोजी व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सुमीने रमजान मुबारक म्हणत हॅशटॅगसह व्हिडिओला “सोफियुम सुजाथायुम” कॅप्शन दिले आणि रील्समध्ये ‘वथिक्कलु वेल्लारीप्रवू’ हे गाणे वापरले आहे. सुमी आणि विष्णूचा रील हा अदिती राव हैदरी अभिनीत 2020 चा मल्याळम चित्रपट सूफियुम सुजाथायुममधील वाथिक्कलु वेल्लारीप्रवु या गाण्याचा रिमेक आहे आणि एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुष यांच्यातील प्रेमकथा चित्रित करते. अशी माहिती आम्हाला मिळाली.

आणखी शोध घेताना आम्हाला व्हीआयपी इंडस्ट्रीजने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर आणि त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केलेली पोस्ट आढळली. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओला “बनावट, दुर्भावनापूर्ण आणि खोडकर जाहिरात” असे म्हटले आहे. कंपनीने जाहिरात केली नाही असे निवेदनात पुढे म्हटले आहे. “आमच्या कंपनीची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात “व्हीआयपी आणि स्कायबॅग ब्रँड नावांचा बेकायदेशीरपणे वापर केला गेला आहे” असेही कंपनीने असेही म्हटले आहे. “व्हीआयपी इंडस्ट्रीजने ही जाहिरात जारी केलेली नाही आणि ज्या व्यक्तीने ही जाहिरात पोस्ट केली आहे त्याच्याशी कंपनीचा कोणताही संबंध नाही. VIP इंडस्ट्रीजने आपल्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.” असे आम्हाला वाचायला मिळाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल व्हिडिओमध्ये व्हीआयपी कंपनीची जाहिरात चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आल्याचे आणि कंपनीचा या व्हिडिओशी काहीही संबंध नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Result: False

Our Sources

Instagram reel posted by sumirashik_official_ on April 21, 2023

Video uploaded by Friday Music Company on June 26, 2020

Tweet made by @InSkybags on April 24, 2023

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular