Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओपासून ते डॉक्टर विकास आमटे...

Weekly Wrap: मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओपासून ते डॉक्टर विकास आमटे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या कॅन्सरवरील मेसेजपर्यंत, या आहेत आठवड्यातील टॉप फेक बातम्या

आताचा मुंबईतील रामनवमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण दावा हा आमच्या तपासात भ्रामक ठरला. तसेच डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर घरगुती उपाय सांगितलाय, असा मेसेज व्हायरल झाला. पण हा देखील दावा भ्रामक ठरला. आमच्या टीमने या आठवड्यातील अशाच काही फेक बातम्यांच्या दाव्याची सत्यता तपासली आहे. 

मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय 

सोशल मीडियावर मुंबईतील नुकत्याच झालेल्या रामनवमीचा व्हिडिओ शेअर केला जात होता. पण आमच्या तपासात हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे, असं आढळले. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

दोन वर्षांपूर्वीचा युपीतला व्हिडिओ खरगोन हिंसेचा म्हणून शेअर केला जातोय

खरगोन हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी काही महिलांना एका गाडीत बसवताना दिसत आहे. हा दावा आमच्या तपासात खोटा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

मध्य प्रदेशातील पोलिसांनी खरंच बुरखा घातलेल्या त्या मुस्लिम महिलेला कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या ? जाणून घ्या सत्य काय आहे 

बुरखा घातलेली एक महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उठाबशा काढताना दिसत आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा दावा आमच्या तपासात भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

महाराष्ट्रातील तीन वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचाराचा म्हणून शेअर केला जातोय, जाणून घ्या सत्य काय आहे 

नुकतेच जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार घडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा हा व्हिडिओ जुना असून तो महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातला आहे, असं आमच्या पडताळणीत आढळले. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा व्हायरल 

कॅन्सर संबंधित डॉक्टर विकास आमटे यांनी उपाय सांगितलाय आणि लिंबूने कॅन्सर बरा होतो. असा मेसेज त्यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हा दावा आमच्या तपासात खोटा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular